Pune Politics | अखेर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ५ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश! 

HomeBreaking News

Pune Politics | अखेर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ५ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश! 

Ganesh Kumar Mule Jan 07, 2025 7:36 PM

Chandrashekhar Bawankule | महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाणून घेतल्या जनतेच्या समस्या
BJP Sanvad Yatra | भाजपाची राज्यस्तरीय संवाद यात्रा | 21 तारखेला पुण्यात पाच हजार पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन
Pune News | पुणे शहरातील अतिक्रमण, उत्खनन प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश | महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

Pune Politics | अखेर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ५ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश!

 

BJP Pune – (The Karbhari News Service) – शिवसेना उद्धव ठाकरे गटाला (Shivsena UBT Pune) पुण्यात मोठा धक्का बसला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या ५ माजी नगरसेवकांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी (BJP) मध्ये प्रवेश झाला आहे. दरम्यान यामुळे महापालिका निवडणुकीला (Municipal Elections)  गती आली आहे. असे आता बोलले जात आहे. (Pune News)

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, संगीता ठोसर, प्राची आल्हाट यांनी त्यांच्या  समर्थकांसह भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, सुनील कांबळे,  राजेश पांडे,  शहराध्यक्ष धीरज घाटे हे उपस्थित होते. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित नव्हते.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मार्गावर या सर्वानी मार्गक्रमण केले याचा मनस्वी आनंद आहे. भारतीय जनता पक्ष आज जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. तो समर्पित कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे आज प्रवेश केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणे समाजापपर्यत पोहोचवावी.

केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले पुणे शहरात भारतीय जनता पार्टीचा मोठा परिवार आहे या कुटुंबात नवीन सदस्यांचे सहर्ष स्वागत करतो.  चंद्रकांतदादा पाटील म्हणाले नव्या जुन्यांची सांगड घालून पक्ष वाढी साठी तुम्ही प्रयत्न कराल ही अपेक्षा आहे.