Mallikarjun Kharge | काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना संसदेच्या प्रवेशद्वारी भाजपच्या खासदारांकडून धक्काबुक्की | भाजपचा निषेध -माजी आमदार मोहन जोशी

HomeBreaking News

Mallikarjun Kharge | काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना संसदेच्या प्रवेशद्वारी भाजपच्या खासदारांकडून धक्काबुक्की | भाजपचा निषेध -माजी आमदार मोहन जोशी

Ganesh Kumar Mule Dec 19, 2024 8:00 PM

Sunil Shinde : असंघटित कामगार काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक पदी सुनील शिंदे यांची निवड
Mohan Joshi : भाजपने घेतलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निर्णयांची छाननी करावी!
Ramesh Bagwe : राष्ट्रवादीने भाजपच्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले  : कॉंग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे यांचा आरोप 

Mallikarjun Kharge | काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना संसदेच्या प्रवेशद्वारी भाजपच्या खासदारांकडून धक्काबुक्की | भाजपचा निषेध -माजी आमदार मोहन जोशी

Congress Vs BJP – (The Karbhari News Service) –  संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुनजी खरगे यांना भाजपच्या खासदारांनी केलेली धक्काबुक्की निषेधार्ह आहे, असे पत्रक माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी प्रसिद्धीला दिले आहे.

राज्यसभेत बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलताना अवमानकारक विधान केले. त्याचा निषेध काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे यांनी नोंदविला आणि ते संसदेत जात असताना, भाजपच्या खासदारांनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे त्यांचा गुडघा दुखावला, तरीही ते संसद भवनात गेले, त्यांनी कामकाजात भाग घेतला. यावेळी भाजपच्या खासदारांनी केलेले वर्तन हे दडपशाही करणारे होते, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

अमित शहा यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्नात भाजपचे नेते त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने अपप्रचार करीत आहेत. त्यांचा तोल गेला असून काँग्रेस अध्यक्षांनाही धक्काबुक्की करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. भाजपने अमित शहा यांना वाचविण्याची कितीही धडपड केली, तरी ती फोल ठरणारी आहे, असे मत मोहन जोशी यांनी व्यक्त केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0