पुणे महानगरपालिका कामगार – कर्मचा-यांची बलाढय एकी
कामगार नेते कॉम्रेड आप्पासाहेब भोसले यांच्या १९ वा स्मृतीदिन निमित्त पीएमसी एम्प्लॉईज युनियनचे विनम्र अभिवादन आणि लाल सलाम
– कॉम्रेड शिवाजी गोखले
पुणे : औद्योगीक क्रांतीनंतर जगभर मालक व मजूर असे दोन वर्ग ठळकपणे भांडवलशाहीमुळे उदयास आले. पिळवणूक व शोषणाच्या विरोधात कामगारवर्गाचा मालकशाहीच्या विरोधात जगभर लढा सुरू झाला. यातूनच लाल बावटा’ व माकर्सवादाच्याच अंगीकार कामगार वर्गाकडून केला गेला. १९१७ साली कॉ. लेनिन यांच्या नेतृत्वाखाली रशियात क्रांती झाली व कामगारवर्गाचे राज्य उदयास आले. भारतात कॉ. श्रीपाद डांगे व इमर साम्यवादी नेत्यांच्या प्रभावशाली नेतृत्वाखाली मुंबईतील गिरणी कामगार व इतर कारखान्यांमधील कामगारवर्ग संघटीत झाला. त्यांनी अभूतपूर्व संघर्ष करून मालकांना व सरकारला कामगारवर्गाच्या हिताचे कायदे करायला आणि योजना आखायला भाग पाडले. बोनसचा व महागाई भत्याचा जन्म याच चळवळीतून झाला. याच काळात देशभर कामगार वर्ग संघटीत लागला. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, संरक्षण खाते यासारख्या शासकीय निमशासकीय खात्यांमधील कामगार, कर्मचारीसुध्दा आपापल आपापल्या मागण्यांकरिता संघटीत होवू लागले.
( फोटो महागाई भत्ता मिळावा यासाठी बेमुदत आंदोलन कॉ प्रभाकर गोखले व इतर)
( कामगार युनियन वर्धापन दिन कॉ आप्पासाहेब भोसले )
१० हिसेंबर १९४३ रोजी नगरपालिकेतील कामगारांची संघटना लाल निशाण कॉ. भाऊ फाटकांच्या मतृत्वाखाली त्यावेळेच्या नगरपालीकेतील कचरा खात्यातील बिगारी, ड्रेनेज खात्यातील बिगारी व सफाई सेविकांनी सर्व प्रथम लाल बावटा हातात घेवून बांधली. यानंतरच्या काळात कॉ. आप्पासाहेब भोसले व कॉ. प्रभाकर गोखले यांच्या लढाऊ नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेतील सर्व खात्यांतील हजारो कामगार, कर्मचा-यांनी यशस्वी आंदोलन केले.कॉ आपासाहेब भोसले आपल्या पीएमसी एम्प्लॉईज युनियन व पुणे महापालिक कामगार युनियन चे जनरल सेक्रेटरी होते. या आंदोलनामध्ये वेळोवेळी पुणे महानगरपालिकेतील लेखनिक, अभियंते व डॉक्टर्स सहभागी झाले. अधिकारी वर्गाची अनेक वेळा साथ लाभली. या आंदोलनामुळे अनेक ऐतिहसिक करार जन्माला आले. प्रसंगी मोर्चे, धरणे आंदोलन, अगदी संपाचे हत्यार सुध्दा या आंदोलनाच्या यशस्वीतेकरीता उपसावे लागले आहे. जकात वाचवा ‘ आंदोलन व त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील महानगरपालिका व नगरपालिकेतील कर्मचा-यांची एकजूट निर्माण झाली. मात्र सरकारच्या नव्या एकतर्फी धोरणामुळे स्थानिक संस्था कर अस्तित्वात आला आणि महापालिकांची आर्थिक स्वायत्तता धोक्यात आली.
मुंबई महानगरपालिका कामगार युनियनचे कॉ.शरद राव, कॉ.महाबळ शेट्टी ,पिंपरी चिंचवड मनपाचे कॉ.बबनराव झिंजुड़ें, कॉ.सुभाष सरीन यांच्यासारख्या नेत्यांची साथ मिळाली. या कामगार नेत्यांनी दिलेले अनमोल योगदान कायम सर्व कामगारांना प्रेरणा देणारं राहील. या सर्व कामगार चळवळीत कॉ सुदाम म्हस्के,कॉ पांडुरंग सावंत,कॉ मामा लोहकणे, कॉ तुकाराम जगताप, कॉ मधुकर पानसे, कॉ बापू पवार, कॉ चंद्रकांत शितोळे, कॉ संजीव मोरे यांचेदेखील अतिशय मोठे योगदान राहिले आहे.
( पीएमसी एम्प्लॉईज युनियन वर्धापन दिन भाषण करताना कॉ प्रभाकर गोखले ,डावीकडे कॉ आप्पासाहेब भोसले ,कॉ डी एल भडगावकर ,कॉ न ग भोसेकर ,कॉ मामा लोहकणे)
१९६८ सालचा वशीला करार, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता मिळावा म्हणून करार, बोनसचा करार, वेळोवेळी वेतन आयोगाचे करार, कामाच्या अटी व शर्तीमध्ये लाभदायक सुधारणा व्हावी या करिता करार, पेन्शन लागू करण्याबाबत करार, गणवेष व विविध भत्ते मिळावेत म्हणून करार असे अनेक, कामगार – कर्मचा-यांचे लाभ करणारे करार चळवळीतूनच प्राप्त झाले.
(१९७१ साली वेतन आयोग फरकासाठी आंदोलनावेळी भाषण करताना कॉ प्रभाकर गोखले )
संकल्पना
प्रदीप महाडिक, अध्यक्ष ; आशिष चव्हाण, कार्याध्यक्ष
पीएमसी एप्लॉइज युनियन.
COMMENTS
अतिशय सुंदर व समर्पक लेख …युनियन चया सर्व योगदानाची चांगली संकलित माहिती …लाल बावटे की जय
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभार. आपल्या अशाच प्रतिसादाने आम्हाला लिहियाला प्रोत्साहन मिळते.