Kasba Peth Chronic Spot | ताडी गुत्ता, गंजपेठ आणि गुरुवार चांदतारा चौक परिसरातील क्रॉनिक स्पॉट बंद, आता रात्रीही केली जाणार परिसराची स्वच्छता

Homeadministrative

Kasba Peth Chronic Spot | ताडी गुत्ता, गंजपेठ आणि गुरुवार चांदतारा चौक परिसरातील क्रॉनिक स्पॉट बंद, आता रात्रीही केली जाणार परिसराची स्वच्छता

Ganesh Kumar Mule Dec 04, 2024 9:07 PM

Kasba Peth Constituency | कसबा पेठ विधानसभा मतदार संघात ३ लाख ८० हजार रुपये जप्त
Pune Helmet News | हेल्मेटसक्तीचा नियम महामार्गांसाठी, शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांना त्रास होणार नाही 
MLA Hemant Rasane | आमदार हेमंत रासने ‘इन ॲक्शन मोड’, कचरामुक्त कसब्यासाठी भल्या पहाटे मतदारसंघात पाहणी

Kasba Peth Chronic Spot | ताडी गुत्ता, गंजपेठ आणि गुरुवार चांदतारा चौक परिसरातील क्रॉनिक स्पॉट बंद, आता रात्रीही केली जाणार परिसराची स्वच्छता

 

MLA Hemant Rasane – (The Karbhari News Service) – कसबा विधानसभा मतदारसंघात विजयी झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने यांनी कामांचा झपाटा लावला. कचरामुक्त कसबा अभियानाचा निर्धार करत रासने यांनी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह मतदारसंघात पाहणी दौरा केला. कचऱ्याच्या क्रॉनिक स्पॉटमुळे अनेक ठिकाणी अस्वच्छता राहत असून दुर्गंधी पसरत असल्याच पाहणीवेळी पुढे आलं होतं. यावर तात्काळ उपाययोजना करण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आली होती. केवळ पाहणी न करता रासने यांच्याकडून पाठपुरावा देखील केला जात असून याला पहिले यश मिळताना दिसत आहे. गंज पेठेतील ताडी गुत्ता आणि गुरुवार पेठेतील चांदतारा चौक परिसरातील क्रॉनिक स्पॉट बंद करण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation- PMC)

भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ताडी गुत्ता, गंज पेठ तसेच गुरुवार पेठेतील चांदतारा चौक परिसर येथील असणारे क्रॉनिक स्पॉट बंद करण्यात आले आहेत. सदर परिसर कचरा मुक्त करून संपूर्ण परिसरातील नागरिकांचा तसेच व्यावसायिकांचा कचरा सकाळ व रात्र सत्रात मनपा व स्वच्छ सेवा सहकारी संस्था यांच्या कर्मचाऱ्यांकडून घरोघरी वर्गीकृत करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील कचऱ्याचे ढीग हटल्याने नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे. आमदार रासने यांनी पाहणी केल्यानंतर तात्काळ पालिकेकडून कार्यवाही करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

याबद्दल बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले. “कचरामुक्त कसबा अभियान राबवण्याचा आमचा संकल्प असून गेल्या आठवड्यात पाहणी करण्यात आल्यानंतर महापालिका प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलत अनेक ठिकाणचे क्रॉनिक स्पॉट बंद करत दिवसातून दोन वेळा स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांच्या मदतीने सामाजिक बदल घडवून आणण्याचा प्रयत्नाला यश मिळत असून स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी कसब्यासाठी आम्ही कायम कटिबध्द आहोत. येत्या काळामध्ये मतदारसंघातील इतर भागातील कचऱ्याची समस्या देखील सोडवली जाईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0