Sonia Gandhi Birthday | सोनीया गांधी वाढदिवसानिमित्त २ ते ९ डिसेंबर २०२४ सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताह  | माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उदघाटक

HomePolitical

Sonia Gandhi Birthday | सोनीया गांधी वाढदिवसानिमित्त २ ते ९ डिसेंबर २०२४ सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताह | माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उदघाटक

Ganesh Kumar Mule Dec 01, 2024 4:57 PM

Code Of Conduct | आदर्श आचारसंहिता पाळण्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांचे एकमत
Light | Susgaon | सुसगावातील महादेव नगरमध्ये अखेर लागले ‘दिवे’!
Service Duty Dedication Week | द्वेषाने विखुरलेल्या भारताला जोडण्याचे काम राहुल गांधी ‘भारत जोडो’ पदयात्रेतून करताहेत | जितेंद्र आव्हाड यांचे प्रतिपादन; अठराव्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे उद्घाटन

 Sonia Gandhi Birthday | सोनीया गांधी वाढदिवसानिमित्त २ ते ९ डिसेंबर २०२४ सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताह

| माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उदघाटक

Mohan Joshi Pune Congress – (The Karbhari News Service) – अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा, आदरणीय श्रीमती सोनीया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा,कर्तव्य आणि त्याग सप्ताह दि. २ ते ९ डिसेंबर २०२४ या कालावधीत साजरा होत असून, सप्ताहाचे उदघाटन महाराष्ट्राचे माजी मुख्य मंत्री, ज्येष्ठ नेते पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या हस्ते होणार असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासजी पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. (Sonia Gandhi)

ही माहिती सप्ताहाचे मुख्य संयोजक, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. उदघाटन सोहळा सोमवार, दि.२ डिसेंबर रोजी पदमजी हॉल, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, टिळक रोड येथे सायंकाळी साडेपाच वाजता होईल.

सेवा,कर्तव्य आणि त्याग सप्ताहाचा उदघाटन सोहळा राजकारणात उत्सुकतेचा ठरलेला आहे. या सोहळ्यात नेत्यांनी आणि विचारवंतांनी केलेली भाषणे राजकारणात गाजलेली असून, त्यावर प्रदीर्घ काळ चर्चा होत राहिली आहे. यंदाचा सोहळाही तीच परंपरा सांभाळेल, असा विश्वास मोहन जोशी यांनी व्यक्त केला.

आदरणीय सोनियाजी गांधी यांनी पंतप्रधान पदाचा त्याग केला याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २००४ सालपासून सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताह काँग्रेसच्या वतीने साजरा करत असून यंदाचे २० वे वर्ष आहे.

भारतीय संविधानाच्या ७५व्या वर्षानिमित्ताने ‘संविधान रक्षण अभियान’ असा विशेष कार्यक्रम या सप्ताहात होणार आहे. याखेरीज महिलांना रोजगार मिळावा याकरिता घरगुती रोजगार शिबिर आयोजित केले जाणार आहे. रक्तदान शिबिर, महाआरोग्य तपासणी शिबिर, दिव्यांगांना फळे, मिठाई, कपडे वाटप तसेच कष्टकरी महिलांना साडी भेट देऊन त्यांचा सत्कारही केला जाणार आहे. शहराच्या विविध भागात हे उपक्रम राबविले जाणार आहेत, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली.