Prashant Jagtap Hadapsar Vidhansabha | हडपसर विधानसभा मतदारसंघात पुन्हा मतमोजणी? EVM मशीन व VVPAT पडताळणीसाठी प्रशांत जगताप यांचा अर्ज

HomeBreaking News

Prashant Jagtap Hadapsar Vidhansabha | हडपसर विधानसभा मतदारसंघात पुन्हा मतमोजणी? EVM मशीन व VVPAT पडताळणीसाठी प्रशांत जगताप यांचा अर्ज

Ganesh Kumar Mule Nov 29, 2024 7:44 PM

Baba Adhav Agitation | उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आत्मक्लेश आंदोलन बाबा आढाव यांनी घेतले मागे
Pune Congress | लोकशाही वाचविण्यासाठी सर्व निवडणुका बॅलेट पेपर वरती घेण्यात याव्‍यात | काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे
Sharad Pawar on EVM | शरद पवार यांनी जाणून घेतली बाबा आढाव यांची भूमिका!

Prashant Jagtap Hadapsar Vidhansabha | हडपसर विधानसभा मतदारसंघात पुन्हा मतमोजणी? EVM मशीन व VVPAT पडताळणीसाठी प्रशांत जगताप यांचा अर्ज

 

EVM Machine – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र राज्य विधानसभेचे निकाल लागल्यानंतर केवळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात EVM बद्दल संशय व्यक्त केला जात आहे. देश विदेशातील जाणकार याबाबत आपले मत मांडत असून EVM मध्ये गैरप्रकार झाल्याची अनेकांची भावना आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनीही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून EVM प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत याबाबत काही पुरावे ही सादर केले. हडपसर मतदार संघात पुन्हा मतमोजणी व्हावी यासाठी त्यांनी अर्ज केला असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १२ लाख ७४ हजार रुपये शुल्कही त्यांनी चलनाच्या माध्यमातून जमा केले आहे.

“कोण आमदार होणार, कोणाची सत्ता येणार एवढ्या पुरताच हा प्रश्न मर्यादित नाही. जनतेच्या मतांची झालेली चोरी थांबवणे, लोकशाहीचे सुरू असलेले वस्त्रहरण रोखणे, या प्रकरणात दोषी असलेल्या देशद्रोही लोकांवर कडक कारवाई करणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याची भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधानावर श्रद्धा असलेला प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून लोकशाहीच्या रक्षणासाठी हा लढा न्यायालयीन पातळीसह रस्त्यावरही सुरूच असेल. आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून या लढ्यातून नक्कीच न्याय मिळेल हा विश्वासही प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0