PMC Employees and officers Helmet | पुणे महापालिकेतील दुचाकी वापरणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हेल्मेट वापरणे बंधनकारक | अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सुरक्षा विभागावर

Homeadministrative

PMC Employees and officers Helmet | पुणे महापालिकेतील दुचाकी वापरणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हेल्मेट वापरणे बंधनकारक | अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सुरक्षा विभागावर

Ganesh Kumar Mule Nov 13, 2024 7:23 PM

PMC CHS Card | एका CHS कार्डवर कर्मचारी किंवा सभासदांना आई-वडील किंवा सासू-सासरे यांनाच लाभ घेता येणार | एकाचवेळी चौघांना लाभ न देण्याचा CHS कमिटीचा निर्णय
PMC Employees Diwali Bonus | पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदाना बाबतचे परिपत्रक जारी | 8.33% + 21000 सानुग्रह अनुदान
PMC Employees and Officers | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पाल्यांचा केला जाणार सन्मान | 24 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुदत

PMC Employees and officers Helmet | पुणे महापालिकेतील दुचाकी वापरणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हेल्मेट वापरणे बंधनकारक | अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सुरक्षा विभागावर

| अतिरिक्त आयुक्तांनी जारी केले आदेश

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) दुचाकीचा वापर करणारे सर्व अधिकारी / कर्मचारी यांना सूचित करण्यात आले आहे की, दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. त्याचे पालन करणे प्रत्येक अधिकारी/कर्मचारी यांचे कर्तव्य आहे. जे अधिकारी/कर्मचारी हेल्मेटचा वापर करणार नाहीत अशा अधिकारी/कर्मचारी यांच्यावर म.ना.से. (शिस्त व अपिल) कलम ३ (१) मधील पोट नियम (१८) पोट नियम (१९) च्या अंतर्गत शिस्तभंगाविषयी कारवाई (दंड व मुळ सेवापुस्तकात नोंद) संबंधित कार्यालय प्रमुखांनी करावयाची आहे. असे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांनी दिले आहेत. (Pune Municipal Corporation- PMC)

पुणे विभागातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, महाविद्यालये तसेच शासकीय यंत्रणांच्या कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले असून याचे पालन सर्व संबधितांनी करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नुकतेच दिले होते. (Pune Helmet News)

त्यानंतर पुणे महापालिकेने देखील आदेश जारी केले आहेत. त्यानुसार भारतात व महाराष्ट्रात रस्ते अपघातात दुचाकी वाहन चालकांची बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच दुचाकी अपघातामध्ये होणा-या मृत्युंची संख्या लक्षणीय आहे. दुचाकी स्वारांनी जर हेल्मेटचा वापर केला तर अपघातामध्ये होणा-या मृत्युंच्या संख्येमध्ये निश्चित घट होवू शकते. त्यामुळे वाहनचालकाने स्वतः आणि सोबत बसलेल्या व्यक्तीने रस्ता सुरक्षा मानकांची पुर्तता करणा-या हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाने दुचाकी वाहन चालकांसाठी हेल्मट वापराची सक्ती व वाहतूक नियमांबाबत जनजागृती करावी अशा सक्त सुचना मा.न्यायमुर्ती श्री. सप्रे यांनी दिले असल्याबाबत संदर्भिय परिपत्रकांमध्ये नमूद केले आहे.

मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १२९ नुसार तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय
यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार दुचाकी चालविणा-या तसेच पाठिमागे बसणा-या व्यक्तिने हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे.

त्यानुसार पुणे महानगरपालिकेतील दुचाकीचा वापर करणारे सर्व अधिकारी / कर्मचारी यांना सूचित करण्यात येते की, दुचाकी वाहन वापरताना हेल्मेट वापरणे बंधनकारक असून त्याचे पालन करणे प्रत्येक अधिकारी/कर्मचारी यांचे कर्तव्य आहे. जे अधिकारी/कर्मचारी हेल्मेटचा वापर करणार नाहीत अशा अधिकारी/कर्मचारी यांच्यावर म.ना.से. (शिस्त व अपिल) कलम ३ (१) मधील पोट नियम (१८) पोट नियम (१९) च्या अंतर्गत शिस्तभंगाविषयी कारवाई (दंड व मुळ सेवापुस्तकात नोंद) संबंधित कार्यालय प्रमुखांनी करावयाची आहे. असे अतिरिक्त आयुक्तांनी म्हटले आहे.

त्याअनुषंगाने सुरक्षा विभाग, पुणे महानगरपालिका यांना आदेशित करण्यात येते कि, त्यांनी दुचाकीचा विना
हेल्मेट वापर करणारे सर्व अधिकारी/कर्मचारी यांना महापालिकेच्या मुख्य भवन तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालय व इतर मनपा इमारतींमध्ये प्रवेश किंवा पार्किंगकरिता परवानगी देवू नये. असे अतिरिक्त आयुक्त यांनी म्हटले आहे.

जीवन अमूल्य असून प्रत्येक जीव वाचविणे महत्वाचे आहे. हे तत्व लक्षात घेवून सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी
रस्ते अपघात कमी होणेचे अनुषंगाने हेल्मेटचा वापर व वाहतूक नियम पाळणे याची सुरुवात स्वतःपासून करावी. या अनुषंगाने घ्यावयाची दक्षता व करावयाच्या उपाययोजना म्हणून हेल्मेट वापराची अंमलबजावणी करावी. असे आदेशात म्हटले आहे.

Screenshot

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0