Vasantrao Deshmukh | आक्षेपार्ह विधान करणाऱ्या वसंतराव देशमुख यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी | कॉंग्रेस नेते प्रशांत सुरसे यांची पुणे पोलिसांकडे मागणी
Prashant Surase Pune Congress – (The Karbhari News Service) – संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे शुक्रवार रोजी भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार व संगमनेर विधानसभा उमेदवार सुजय विखे यांनी आयोजित केलेल्या संकल्प सभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या व काँग्रेसच्या नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात यांचे नाव घेत त्यांना उद्देशून अश्लील वक्तव्य केले. तसेच घराबाहेर फिरू देणार नाही अशी जाहीर सभेमध्ये धमकी सुद्धा दिली. या बाबत वसंतराव देशमुख यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कॉंग्रेस नेते प्रांतिक प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रशांत सुरसे यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. (Maharashtra News)
सुरसे यांनी दिलेल्याया निवेदनानुसार वसंतराव देशमुख नामक एका माथेफिरुने विधान सभा आचारसंहितेच्या काळामध्ये भर सभेमध्ये असणाऱ्या हजारो महिलांसमोर तसेच प्रसार माध्यमातून हे भाषण प्रसारित झाल्याने महाराष्ट्रातील कोट्यावधी माता भगिनींचे मनास लज्जा निर्माण होईल असे अपमानास्पद वक्तव्य केलेले आहे. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करीत आहे. तरी वसंतराव देशमुख रा. संगमनेर ता. संगमनेर जि. अहिल्यानगर यांच्या विरुद्ध महिलेचा अपमान करणे ,मनास लज्जा होईल असे वक्तव्य करणे तसेच लोकसेवकाला जिवे मारण्याची धमकी देणे बाबत कायदेशीर कारवाई करावी.
यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा अनेक नेत्यांनी आमचे नेते राहुल गांधी ,सोनिया गांधी व इतर नेते यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन भाष्य केले आहे तरीसुद्धा पोलीस प्रशासन गृह खात्याच्या दबाव खाली राहून कुठली कारवाई करत नाही. महिलांच्या बाबतीत अशा प्रकारचे भाष्य व वर्तणूक करणे एक गंभीर बाब आहे महाराष्ट्रातील महिला यामुळे सुरक्षित आहे का नाही ? एका तरुण सुशिक्षित,सुसंस्कृत महिलेने समाजाचे नेतृत्व करावे की नाही ?असा प्रश्न निर्माण होतो.
तसेच डॉक्टर जयश्रीताई बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या महिला नेत्यावर अशा प्रकारच्या अश्लील खालच्या पातळीवर भाष्य केल्याने महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींमध्ये मध्ये राजकीय सामाजिक असुरक्षित व असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. असे सुरसे यांनी म्हटले आहे
आपण वरील व्यक्तीवर त्वरित गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनवर राहील. असा इशारा सुरसे यांनी दिला आहे. यावेळी नंदकुमार अजोतिकर, शुभम काळे, अंकित गोरे उपस्थित होते.
COMMENTS