Pune Congress | येणारा महिना पक्षासाठी समर्पित करा | पुणे काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना

HomeBreaking News

Pune Congress | येणारा महिना पक्षासाठी समर्पित करा | पुणे काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना

Ganesh Kumar Mule Oct 16, 2024 7:18 PM

Aba Bagul Pune Loksabha | पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडी कडून आबा बागुल यांचं नाव जवळपास निश्चित!
kasbapeth Bypoll | कसबा पेठ पोटनिवडणूक | अखेर ठरलं | रासने विरुद्ध धंगेकर 
Mahavikas Aghadi | Maratha Samaj | मराठा समाजाच्या समर्थनार्थ महविकास आघाडीचे धरणे आंदोलन

Pune Congress | येणारा महिना पक्षासाठी समर्पित करा | पुणे काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना

 

Vidhansabha Election- (The Karbhari News Service) – पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ च्या तयारी संदर्भात चर्चा करण्यासाठी आज काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. येणारा महिना हा पक्षासाठी समर्पित करा. अशा सूचना कार्यकर्त्यांना यावेळी देण्यात आल्या. (Pune Congress)

सदर बैठकीत पुणे शहरातील ८ विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांकडून सूचना घेण्यात आल्या. या बैठकीला विविध नेत्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते, प्रमुख पदाकारी व कार्यकर्ते यांनी पुणे शहरातील ८ विधानसभेतील उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार एक मताने व्‍यक्त केला. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये कार्यकर्त्यांना आपापसातील मतभेद बाजूला ठेवून येणारा महिना हा पक्षासाठी समर्पित करून पक्षश्रेष्ठी जे महाविकास आघाडीचे उमेदवार देतील त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्यासाठी सचोटीने प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन केले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, दिप्ती चवधरी, महिला अध्यक्ष पुजा आनंद, पुणे लोकसभा समन्वय अजित दरेकर, नगरसेवक अविनाश बागवे, रफिक शेख, मनिष आनंद, उस्मान तांबोळी, मेहबुब नदाफ, भिमराव पाटोळे, प्रियंका रणपिसे, सुजित यादव, प्रदिप परदेशी, समिर शेख, आशितोष शिंदे, रमेश सोनकांबळे, अजित जाधव, अक्षय माने, राजू ठोंबरे, रमेश सकट, विशाल जाधव, संतोष पाटोळे, हेमंत राजभोज, सुनिल शिंदे, कैलास गायकवाड, राजेंद्र भुतडा, सतिश पवार, नितीन परतानी, शिवराज भोकरे, रवि आरडे, नारायण पाटोळे, रवि आरडे, उषा राजगुरू, सुंदर ओव्‍हाळ, छाया जाधव, अर्चना शहा, अनुसया गायकवाड, राज अंबिके, अनिल पवार, नुर शेख, सुरेश नांगरे, नुर शेख, विनोद रणपिसे, हर्षद हांडे, अजय खुडे, राधिका मखामले, कल्पना उनवणे, अनिता मखवाणी आदी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0