PMC Property Tax Department | प्रॉपर्टी टैक्स विभागातील कर्मचाऱ्यांसाठी तणावमुक्त जीवन जगण्याची कार्यशाळा!

Homeadministrative

PMC Property Tax Department | प्रॉपर्टी टैक्स विभागातील कर्मचाऱ्यांसाठी तणावमुक्त जीवन जगण्याची कार्यशाळा!

Ganesh Kumar Mule Oct 11, 2024 6:56 PM

Pune Municipal Corporation (PMC) launched investigation campaign to give 40% Property tax discount!
PMC Property Tax Department has registered more than 53 thousand new properties in the financial year 2023-24
PMC PT 3 Application | PT 3 अर्ज भरण्यासाठी नागरिकांना जून पर्यंत मुदत देण्याच्या हालचाली | प्रॉपर्टी टॅक्स विभागाची महापालिका आयुक्तांकडे मागणी

PMC Property Tax Department | प्रॉपर्टी टैक्स विभागातील कर्मचाऱ्यांसाठी तणावमुक्त जीवन जगण्याची कार्यशाळा!

 

PMC Property Tax Employees- (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन (Pune Municipal Corporation property tax Department) कार्यालयाकडील कर्मचाऱ्यांसाठी तणावमुक्त जीवन जगण्याची कार्यशाळा घेण्यात आली. जेष्ठ व्याख्याते डॉ. दत्ता कोहिनकर (Dr Datta Kohinkar) यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला शिवाय नेहमी अशा कार्यशाळा आयोजित केल्या जाव्यात, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. (Pune PMC News)

मागील वर्षीपेक्षा २४५ कोटी अधिक उत्पन्न!

कर आकरणी व कर संकलन कार्यालय हे पुणे महानगरपालिकेतील उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहे. मुख्य सभा व स्थायी समिती  २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता २८७५ कोटी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. आज पर्यंत १६९० कोटी इतकी वसुली केली आहे. गतवर्षी पेक्षा या वर्षी २४५ कोटी इतकी जास्तीची वसुली केली आहे. तसेच उर्वरित उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी कार्यालयाकडून वसुलीची मोहीम
राबविण्यात येत आहे.

कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडील कामकाजाची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. सदर कामकाजामुळे सेवकांवर अतिरिक्त तणाव राहू नये याकरिता व सेवकांनी तणावमुक्त व सुखी जीवन जगण्यासाठी, व्यक्तिमत्व विकास, मनाची अमर्याद शक्ती उत्तम नातेसंबंध जोपासणे, व्यसनमुक्ती व पैशाचे व्यवस्थापन या बाबत कार्यशाळा जेष्ठ व्याख्याते डॉ. दत्ता कोहिनकर यांनी घेतली.

कार्यशाळा माधव जगताप, उप आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत अस्मिता तांबे (धुमाळ). महापालिका
सहाय्यक आयुक्त, सुनील मते, महापालिका सहाय्यक आयुक्त, रविंद्र धावरे, प्रशासन अधिकारी, सर्व कार्यालयीन अधीक्षक, विभागीय निरीक्षक, पेठ निरीक्षक व इतर सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0