Dr Ramesh Shelar PMC | डॉ रमेश शेलार यांना राज्यपालांच्या हस्ते गोल्ड मेडल देऊन केले जाणार सन्मानित!

Homeadministrative

Dr Ramesh Shelar PMC | डॉ रमेश शेलार यांना राज्यपालांच्या हस्ते गोल्ड मेडल देऊन केले जाणार सन्मानित!

Ganesh Kumar Mule Sep 22, 2024 8:00 PM

Dr Ramesh Shelar | अकार्यकारी पदाचा अतिरिक्त पदभार कार्यकारी उपायुक्तांकडे कसा? डॉ रमेश शेलार यांनी उपस्थित केला प्रश्न 
Swimmer Sampanna Shelar | पुण्याचा जलतरणपटू संपन्न शेलार याचा अरबी सुमद्रात अनोखा विक्रम!  | सव्वा चार तासांत सुमारे 28.5 किमी अंतर पोहून केले पार 
Dr Ramesh Shelar PMC | डॉ रमेश शेलार यांचा पीएचडी केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते गोल्ड मेडल देऊन सन्मान! | कार्यकारी पद देण्याची मागणी

Dr Ramesh Shelar PMC | डॉ रमेश शेलार यांना राज्यपालांच्या हस्ते गोल्ड मेडल देऊन केले जाणार सन्मानित!

| पीएचडी प्रबंधाबाबत होणार सन्मान!

 

Dr Ramesh Shelar PMC- (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्य घनकचरा विभागात (PMC Solid Waste Management Department) पर्यावरण व्यवस्थापक (अकार्यकारी) पदावर काम करणारे अधिकारी डॉ रमेश शेलार (Ramesh Shelar) यांना राज्यपालांच्या हस्ते गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. MIT विद्यापीठाच्या आवारात हा कार्यक्रम उद्या ३ वाजता संपन्न होणार आहे. (PMC Officers)

डॉ शेलार यांना एमआयटी विद्यापीठाने (MIT University) पीएचडी (Ph.D.) प्रदान केली आहे. विद्यापीठाकडून त्यांचा प्रबंध उत्कृष्ट असल्याचे मान्य केले होते. (Pune Municipal Corporation (PMC)

पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले अधिकारी रमेश शेलार, मुख्य सुरक्षा अधिकारी तथा अकार्यकारी पर्यावरण व्यवस्थापक ( घनकचरा व्यवस्थापन विभाग) पुणे महानगरपालिका यांना एम.आय.टी. आर्ट, डिझाईन, टेक्नोलॉजी युनिवर्सिटी पुणे यांचे कडून त्यांनी सादर केलेले प्रबंध “THE STUDY OF TRANSFORMATION OF SOLID WASTE TO REVENUE WITH REFERENCE TO MUNICIPAL CORPORATIONS IN WESTERN REGION OF MAHARASHTRA” यांस 4 एप्रिल रोजी पि.एच.डी. प्रदान करण्यात आली आहे. या प्रसंगी सुनिता कराड, डॉ. छबी सिन्हा चव्हाण यांनी रमेश शेलार यांचे प्रबंध उत्कृष्ट असल्याचे मान्य केले होते.

दरम्यान MIT विद्यापीठाचा उद्या दीक्षांत समारंभ आहे. यात ५३ पीएचडी धारकांना गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यात डॉ शेलार यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. महापालिकेच्या काही मोजक्याच अधिकाऱ्यांपैकी पीएचडी आणि गोल्ड मेडल मिळवणारे म्हणून डॉ शेलार यांना मान मिळाला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0