Prashant Jagtap | प्रशांत जगताप यांचे राष्ट्रपतींना  निमंत्रण | पुणे शहरात मुक्काम करा व पुणेकरांच्या यातना जाणून घ्या!

HomeBreaking News

Prashant Jagtap | प्रशांत जगताप यांचे राष्ट्रपतींना निमंत्रण | पुणे शहरात मुक्काम करा व पुणेकरांच्या यातना जाणून घ्या!

Ganesh Kumar Mule Sep 21, 2024 8:01 PM

Congress | Pune | मोदी आणि शाह यांना विसरण्याचा आजार | पुणे काँग्रेसची टीका
Free Travel | ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ | सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लाभ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
PMC Pune Health Scheme | पुणे महापालिकेच्या अंशदायी वैद्यकीय योजनेबाबत आरोग्य विभागाचे नवीन आदेश 

Prashant Jagtap | प्रशांत जगताप यांचे राष्ट्रपतींना  निमंत्रण | पुणे शहरात मुक्काम करा व पुणेकरांच्या यातना जाणून घ्या!

Pune Potholes- (The Karbhari News Service) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (President Draupadi Murmu) – यांना दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यात शहरातील खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागला. यानंतर राष्ट्रपती भवनाने पुणे पोलिसांना पत्र लिहून खड्ड्यांबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. (Pune News)

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राष्ट्रपतींना एक आठवड्यासाठी पुणे मुक्कामाचे निमंत्रण दिले आहे.

दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यात आपल्याला शहरातील खड्ड्यांचा प्रत्यय आला, याची दखल घेत आपण प्रशासनास आवश्यक सूचना दिल्या याबद्दल आपले तमाम पुणेकरांच्या वतीने प्रशांत जगताप यांनी राष्ट्रपतींचे आभार व्यक्त केले.

पुणेकर नागरिक आपल्या दैनंदिन जीवनात असंख्य यातना भोगत आहेत. रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक कोंडी, टेकड्यांची फोडाफोडी याने पुण्याचा श्वास गुदमरतोय, अपघातांच्या भीतीने प्रत्येक पुणेकर जीव मुठीत घेऊन फिरतोय, मुळा – मुठा नदीला प्रदूषणाचा विळखा, एका पावसात तुंबणारे रस्ते, दिवसाढवळ्या पुण्यातील रस्त्यांवर होणारे खून – दरोडे अशा अवस्थेत पुणेकर जगत आहेत.

गल्ली ते दिल्ली सत्तेत असलेले सत्ताधारी जनतेच्या वेदनांकडे लक्ष देण्यास तयार नाही. म्हणूनच, पुणेकरांच्या या वेदना अनुभवण्यासाठी राष्ट्रपतींनी आठ दिवस पुण्यात मुक्काम करावे. अशी विनंती प्रशांत जगताप यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0