समाविष्ट 23 गावातील कर्मचारी 4 महिन्यापासून वेतनाविना
: कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ
पुणे : महापालिका हद्दीत जून महिन्यात नवीन 23 गावांचा समावेश करण्यात आला आहे. तेव्हापासून ग्रामपंचायती बरखास्त करण्यात आल्या असून तेथील कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. मात्र त्यांना अजूनही महापालिकेकडून वेतन देण्यात आले नाही. असा आरोप महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी केला आहे. शिवाय ग्रामपंचायतीकडे कार्यरत असताना जे वेतन होते तेच वेतन या कर्मचाऱ्यांना दिले जावे. अशी मागणी धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.
: विरोधी पक्ष नेत्या धुमाळ यांचे आयुक्तांना पत्र
धुमाळ यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार दि.३०/०६/२०२१ रोजी तत्कालीन २३ ग्रामपंचायती पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सदर २३ ग्रामपंचायतीकडील कर्मचारी वर्गाचे वेतन गेली चार महिन्यापासुन प्रलंबित आहे. त्यामुळे सदर कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच कोरोना काळातील त्यांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे सदर कर्मचारी यांच्या मुलांची शिक्षणाची फी, लाईट बिले, घराचे हफ्ते देणे प्रलंबित आहेत. सद्यस्थितीत दिवाळी चालु आहे. त्यामुळे कर्मचारी यांना सन साजरा करण्यास व दैनंदिन उदरनिर्वाह करण्यासाठी आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखिची आहे. तरी सदर कर्मचारी यांना दैनंदिन जीवन जगण्यासाठी त्यांना सद्यस्थितीतमध्ये तत्कालीन ग्रामपंचायतीकडे कार्यरत असताना जे वेतन होते तेच वेतन दि.३०/०६/२०२१ रोजी पासुन चालू करावे. अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.
—
COMMENTS