PMC Employees union : महापालिका कर्मचाऱ्यांनी बनवलेल्या लघुपटाचे सचिन तेंडुलकर करणार प्रमोशन 

HomeपुणेPMC

PMC Employees union : महापालिका कर्मचाऱ्यांनी बनवलेल्या लघुपटाचे सचिन तेंडुलकर करणार प्रमोशन 

Ganesh Kumar Mule Nov 01, 2021 4:29 PM

Show cause notice | महापालिकेच्या 157 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस! 
Abhay Yojana : PMC : स्थायी समितीने ‘अभय’ दिले; प्रशासनाकडून मात्र ‘अंमल’ नाही!
40% Tax Exemption | ४०% करसवलत | राज्य सरकार घालणार लक्ष | मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

महापालिका कर्मचाऱ्यांनी बनवलेल्या लघुपटाचे सचिन तेंडुलकर करणार प्रमोशन

: महापौरांनी आज टीजर आणि पोस्टर चे केले अनावरण

पुणे : महापालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या साप्ताहिक सुट्टीत “सचिन लाईव्ह फ्रॉम पुणे” हा लघुपट बनवला आहे. पुणे महापालिका आणि पीएमसी एम्प्लॉईज युनियन यांची निर्मिती असलेल्या या लघुपटाचे प्रमोशन खुद्द क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि गीतकार गुलजार करणार आहेत. दरम्यान आज वसुबारसेच्या मुहूर्तावर या लघुपटाच्या टीजर आणि पोस्टर चे अनावरण महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.

: मनपा आणि पीएमसी एम्प्लॉईज युनियन यांची निर्मिती

याबाबत पीएमसी एम्प्लॉईज च्या वतीने सांगण्यात आले कि, या फिल्ममध्ये काम करणारे सर्व कलाकार हे पुणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी आहेत.  तर बालकलाकार हे पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील असून काही बालकलाकार हे कर्मचाऱ्याची मुले आहेत. या फिल्मची कथा पटकथा – संवाद – प्रोडक्शन डिसाईन- आणि दिग्दर्शन आपले कर्मचारी गणेश देविदास कदम (वरिष्ठ लिपिक) यांनी केले आहे.
या फिल्मचे सर्व काम कलाकारांनी आपले पुणे महानगरपालिकेचे दैनदिन कामकाज सांभाळून साप्तहिक सुट्ट्यांमध्ये केले आहे. फिल्मचे चित्रीकरण मे-२०१९ मध्ये पूर्ण झाले आहे. लहान मुले खेळातील जखम, इन्जुरी, अपघात घरातल्या माणसापासून मार मिळेल, खेळणे बंद होईल या भीतीने लपवून ठेवतात. पुढे ती जखम वाढत जाऊन धोकादायक होवू शकते. जीवावर बेतू शकते. त्यामुळे लहान मुलांनी घरच्यांपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नये हा मेसेज हि फिल्म देते.

: आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये आपला ठसा उमटवला

“सचिन लाईव्ह फ्रॉम पुणे” या फिल्मने अनेक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये आपला ठसा उमटवलेला आहे.
या फिल्मला “आर्यन आंतरराष्ट्रीय चिल्ड्रेन फिल्म फेस्टिवल, जयपूर – २०२१ येथे बेस्ट शॉर्ट फिल्म हा अॅवार्ड मिळाला आहे.
तसेच ‘मद्रास आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल, चेन्नई – २०२१ येथे नरेबल मेन्शन हा अॅवार्ड मिळाला आहे. बार्सिलोना येथे होणाऱ्या बाराव्या बार्सिलोना आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल – २०२१ साठी या फिल्मची निवड झाली आहे. फिनलंड येथे होणाऱ्या कोट्का आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल . २०२१ येथे या फिल्मला नामांकन मिळाले आहे. दिल्ली येथे होणाऱ्या the black panthar International film festival – २०२१ मध्ये या फिल्मची निवड झाली आहे. बैंगळूरू येथील नोबल आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल आणि अवार्डस – २०२१ साठी या फिल्मची निवड झाली आहे.
युनियन चे कार्याध्यक्ष आशिष चव्हाण यांनी सांगितले कि लवकरच या फिल्मचे प्रमोशन महान क्रिकेटर भारतरत्न सचिन  तेंडूलकर आणि ऑस्कर विजेते गीतकार गुलजार  यांच्या उपस्थीतीत करण्याचा मानस आहे. त्यासाठीही पुणे महानगरपालिकेने असेच सहकार्य करावे हि विनंती आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0