Mukhyamantri  Majhi Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज रिजेक्ट झाल्यानंतर काय करावे? जाणून घ्या पुणे महापालिकेने काय केले आवाहन! 

HomeBreaking Newsपुणे

Mukhyamantri  Majhi Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज रिजेक्ट झाल्यानंतर काय करावे? जाणून घ्या पुणे महापालिकेने काय केले आवाहन! 

गणेश मुळे Aug 02, 2024 4:47 PM

Khadakwasala Vidhansabha | NCP Ajit Pawar खडकवासला विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला देण्याची मागणी | अजित पवारांनी दिला सकारात्मक प्रतिसाद
PMC Action Against Hotels | मोहम्मदवाडी, कर्वेनगर परिसरात महापालिका बांधकाम विभागाची हॉटेल वर कारवाई 
Sharad Pawar : घरावरील हल्ल्यानंतर एसटीच्या नेतृत्वाबाबत शरद पवार म्हणाले…..

Mukhyamantri  Majhi Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज रिजेक्ट झाल्यानंतर काय करावे? जाणून घ्या पुणे महापालिकेने काय केले आवाहन!

Pune Municipal Corporation – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या (Pune PMC) १५ क्षेत्रिय कार्यालयांमध्ये (PMC Ward Office) मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin) प्राप्त अर्जांची छाननी चे काम सुरू आहे. अर्जाच्या छाननीत आधार कार्ड अस्पष्ट असणे, रेशनिंग कार्डचे मागील बाजू अपलोड न करणे, बँकेचे खाते रहिवास पुरावा न जोडणे किंवा अर्धवट जोडणे, हमीपत्र न जोडणे, परराज्यातील रहिवाशी किंवा लग्न करून पुण्यात पंधरा वर्षापासून रहिवाशी असल्याचा पुरावा न जोडणे, रेशनिंग कार्ड न जोडणे, उत्पन्नाचा पुरावा न जोडणे अशा कारणांसाठी अर्जदार लाभार्थ्यांचे अर्ज छाननी अंती तात्पुरते रिजेक्ट करणेत आले आहेत. (Pune Municipal Corporation-PMC)

 

पुणे महापालिकेने नागरिकांना केले हे आवाहन

तात्पुरते रिजेक्ट केल्यावर अर्जादारास मोबाईलवर कारणासह मेसेज येतो. तरी ज्या लाभार्थ्यांना तात्पुरते रिजेक्टचे मेसेज त्यांनी दिलेल्या मोबाईल वर आले आहेत, त्यांना केवळ एकदाच सुधारीत माहिती करण्याची, कागदपत्रे अपलोड करणेची संधी आहे. जर त्यांनी वेळेत व आवश्यक असलेले कागदपत्रे अपलोड न केल्यास अथवा माहिती न भरल्यास त्यांचा अर्ज अॅप्रुव्ह होणार नाही व त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.  लक्षात असू द्या, तुम्ही ज्या ठिकाणाहून / मोबाईलवर अर्ज भरला आहे, त्याच मोबाईल नंबरवर ठिकाणावरील संगणकात चूक दुरुस्ती होणार असल्याने त्याच मोबाईलवरून कागदपत्रे अपलोड करावी. 

याशिवाय मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरणेकरीता https://www.ladakibahin.maharashtra.gov.in ही लिंक तयार झाली असून या लिंक वरून अर्ज करणेची सुविधा उपलब्ध करणेत आली आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. तरी पुणे शहर व आसपासच्या लाभार्थ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर अर्ज त्रुटी संदर्भात मेसेज आला असल्यास त्याची पुर्तता करावी. जेणेकरून अनुदानाचा लाभ लवकरात लवकर मिळणेस मदत होईल. सदर योजनेचे अर्ज भरणेकरीता आशा वर्कर, बचत गटातील महिला (सी.आर.पी.), अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, बालवाडी सेविका, सेतु सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, सिटी मिशन मॅनेजर, मदत कक्ष प्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना अधिकृत केले असून त्यांचेमार्फत अर्ज भरून मंजुर झालेल्या प्रत्येक अर्जापोटी त्यांना र.रू. ५०/- मिळणार असल्याचे शासन निर्णयात नमूद असून वरील अधिकृत व्यक्तींनी https://www.ladakibahin.maharashtra.gov.in या लिंकचा वापर करून जास्तीत जास्त गरजू महिलांचे अर्ज व्यवस्थित अपलोड करावे. समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी हे आवाहन केले आहे.