Maharashtra MLC | विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 11 सदस्यांचा शपथविधी संपन्न 

HomeBreaking NewsPolitical

Maharashtra MLC | विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 11 सदस्यांचा शपथविधी संपन्न 

गणेश मुळे Jul 28, 2024 4:28 PM

Siddheshwar Shinde Transfer | लेखाधिकारी सिध्देश्वर  शिंदे यांची नागपूर विभागात बदली | राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून आदेश जारी 
MSRTC | (Liquefied Natural Gas (LNG)| राज्यातील ५००० एस टी बसेस डिझेल ऐवजी एलएनजीवर धावणार | महामंडळाची २३४ कोटी रुपयांची बचत होणार
Savitribai Phule Smarak | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी | अजित पवार

Maharashtra MLC | विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 11 सदस्यांचा शपथविधी संपन्न

| उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिली शपथ

 

Maharashtra News – (The Karbhari News Service) –  विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान पार पडले होते. या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व सदस्यांना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी शपथ दिली.

यामध्ये पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, भावना गवळी, कृपाल तुमाने, योगेश टिळेकर, डॉ. प्रज्ञा सातव, शिवाजीराव गर्जे, अमित गोरखे, मिलिंद नार्वेकर, राजेश विटेकर या 11 सदस्यांनी शपथ घेतली.

विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सर्व नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.