Pune Cantonment Vidhansabha | Pune Congress | पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून बौद्ध समाजाला उमेदवारी देण्याची मागणी | काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नाना पटोले यांच्याकडे मागणी
सभा मतदारसंघ मधून बौद्ध समाजाला उमेदवारी देण्याची मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करण्यात आली आहे. (Pune Congress)
| भाजप प्रवेशाच्या उंबरठ्यावर असणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करा
निवडणुकीच्या तोंडावर पुणे शहर काँग्रेस पक्षातील वातावरण प्रदूषित करून फोडाफोडीचे राजकारण करणारे नेते यांना आता सामान्य कार्यकर्ते वैतागले आहे. अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस पदाधिकारी व्यक्त करत आहेत.
भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा निवडणुकीचे आश्वासन घेतलेले कधी तळ्यात कधी मळ्यात राहणारे, असे विरोधी नेत्यांना आता हाकलून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी अशी भावना कॉंग्रेस पदाधिकारी यांनी व्यक्त केली.
-
पदाधिकारी बदलले जाणार नाहीत
नाना पटोले यांच्यासोबत झालेल्या बैठकी वेळी के सी वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथेला हे देखील उपस्थित होते. त्यांनी सांगतिले कि, सध्या आहेत तेच पदाधिकारी विधानसभा निवडणुकीसाठी राहतील. त्यात कुठलाही बदल केला जाणार नाही. मात्र विधानसभेचा उमेदवार देताना नवीन उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. असे निर्णय या बैठकीत झाले. अशी माहिती सूत्रांनी दिली.
यावेळी बाळासाहेब शिवरकर, आनंद गाडगीळ, दीप्ती चौधरी, कमल व्यवहारे, माजी नगरसेविका वैशालीताई मराठे, सुजाता शेट्टी, लताताई राजगुरू, रफिक शेख ,मेहबूब नदाफ, अजित दरेकर, संगीता तिवारी, माजी नगरसेवक नंदलाल दिवार, माजी नगरसेवक संतोष आरडे मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष सुजित आप्पा यादव, सर्व ब्लॉग अध्यक्ष सर्व सेलचे अध्यक्ष, एन एस सी अध्यक्ष, क्रीडा अध्यक्ष, मायनॉरिटीचे अध्यक्ष त्याचबरोबर प्रमुख पदाधिकारी, शहराचे उपाध्यक्ष शहराचे सरचिटणीस सेलचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.