School Timing | सर्व शाळांची वेळ सकाळी नऊ करणे गैरसोयीचे| पालक संघटना व विद्यार्थी वाहतूक चालकांचा विरोध

HomeपुणेBreaking News

School Timing | सर्व शाळांची वेळ सकाळी नऊ करणे गैरसोयीचे| पालक संघटना व विद्यार्थी वाहतूक चालकांचा विरोध

गणेश मुळे Jul 10, 2024 3:37 PM

PMC Birth Death Certificate | पुणेकरांना आता ईमेल वर देखील मिळू शकेल जन्म-मृत्यू प्रमाणपत्र! | महापालिकेने उपलब्ध करून दिली सुविधा!
Kasba Constituency | सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स लावणार नाही! – आमदार हेमंत रासने यांचा निर्णय |  अंकुश काकडे यांनी विचारला हा प्रश्न!
PMRDA Hoarding Policy | पीएमआरडीएच्या अधिकारक्षेत्रातील अनधिकृत होर्डिंग्सला बसणार चाप | PMRDA ची होर्डिंग पॅालिसी प्रसिद्ध

School Timing | सर्व शाळांची वेळ सकाळी नऊ करणे गैरसोयीचे|  पालक संघटना व विद्यार्थी वाहतूक चालकांचा विरोध

 

School Timing – (The Karbhari News Service) – शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा नऊ नंतर भरवण्याबाबत 8 फेब्रुवारी 2024 रोजी शासन परिपत्रक काढले होते. पण बहुतांश पालकांच्या कार्यालयीन वेळ व शाळेची वेळ एकच असल्यामुळे शाळेची बदललेली वेळ ही गैरसोयीची ठरत आहे. यासोबतच पालक शिक्षक संघटनेकडून शाळेची वेळ बदलण्याबाबत विरोध होत आहे. (Sunil Shinde RMS)

पुणे शहरातल्या सर्व शाळांनी शाळेची वेळ सकाळी नऊची केली तर मध्यवर्ती भाग विशेषत: पेठ भागातील शाळेत जाण्यासाठी वाहतूक कोंडी होईल. यासोबतच जर वेळ एकच ठेवली तर शाळेत विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या विद्यार्थी वाहतूक चालकांची गैरसोय होणार आहे. कारण याआधी शाळेच्या वेळा वेगवेगळ्या असल्यामुळे विद्यार्थी वाहतूक चालक विविध शाळांच्या ट्रिपा करत होते. जर एकच वेळी केली तर विद्यार्थ्यांच्या वाहतूक खर्चामध्ये नाईलाजास्तव वाढ होईल व याचा भार हा पालकांवर पडेल. यामुळे पालकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असंतोष पसरत आहे. तसेच ज्या शाळा पूर्वीप्रमाणेच 7 वाजता भरवत आहेत अशा शाळांवर प्रशासन कारवाई करणार आहे.

याबाबत नुकतीच पुणे शहरातील विद्यार्थी वाहतूक चालकांची बैठक राष्ट्रीय मजदूर संघटनेचे (RMS) अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पालक संघटना व विद्यार्थी वाहतूक चालकांची ही गैरसोय शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे(RMS) अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी जिल्हाधिकारी माननीय ज्योती कदम व शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटक विशाल बागुल, विद्यार्थी चालक प्रतिनिधी रवी गुंजाळ, दत्ता भोसले, श्रीपाद पाटणे उपस्थित होते.