Anti Drug Day | पुणे शहर हे विद्येचे माहेरघरच राहणार ड्रग्स चा अड्डा होऊ देणार नाही  धीरज घाटे

HomeपुणेBreaking News

Anti Drug Day | पुणे शहर हे विद्येचे माहेरघरच राहणार ड्रग्स चा अड्डा होऊ देणार नाही  धीरज घाटे

गणेश मुळे Jun 26, 2024 2:54 PM

Dheeraj Ghate | BJP Pune | पुणे भाजप शहर अध्यक्ष पदी धीरज घाटे
Pune BJP Vs Pune Congress | पुण्याच्या वाहतुक कोंडीला काँग्रेसच जबाबदार | भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांची टीका
Tipu Sultan | Pune BJP | टिपू सुलतान चे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही | धीरज घाटे

Anti Drug Day | पुणे शहर हे विद्येचे माहेरघरच राहणार ड्रग्स चा अड्डा होऊ देणार नाही  धीरज घाटे

Anti Drug Awareness – (The Karbhari News Service) –  जागतिक अमली पदार्थ तस्करी विरोधी दिनाचे तसेच नुकत्याच पुण्यात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पुणे शहर महिला मोर्चा च्या वतीने आज गोखले चौक येथील कलाकार कट्ट्यावर मानवी साखळी चे आयोजन करण्यात आले.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले ‘पुणे हे विद्येचे माहेरघर आहे इथे अनेक शैक्षणिक संस्था या चांगले विद्यार्थी घडवतात जे देशाचे भविष्य आहेत, काही वाईट प्रवृत्ती पुण्याचे नाव बदनाम करू पाहत आहेत. त्यांचे उदिष्ट आम्ही कधीच सफल होऊ देणार नाही पबसंस्कृती पुणे शहरातून हद्दपार केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. असे प्रतिपादन घाटे यांनी केले.

यावेळी महिला मोर्चा सरचिटणीस प्रियांका शेंडगे शिंदे, स्वाती मोहोळ, भावना शेळके ,खुशी लाटे ,आरती कोंढरे गायत्री खडके, अपर्णा खुराडे अश्विनी पवार यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.