Pune BJP | शाळांच्या बाहेरील पान टपऱ्यावर तातडीने कारवाई करा | धीरज घाटे

HomeपुणेBreaking News

Pune BJP | शाळांच्या बाहेरील पान टपऱ्यावर तातडीने कारवाई करा | धीरज घाटे

गणेश मुळे Jun 18, 2024 3:22 PM

Pune News | स्वारगेट परिसरातील केबल दुर्घटना प्रकरणी तातडीने कारवाई व केबल ऑडिट करा | भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची मागणी
Tipu Sultan | Pune BJP | टिपू सुलतान चे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही | धीरज घाटे
Pune BJP Vs Pune Congress | पुण्याच्या वाहतुक कोंडीला काँग्रेसच जबाबदार | भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांची टीका

Pune BJP | शाळांच्या बाहेरील पान टपऱ्यावर तातडीने कारवाई करा | धीरज घाटे

Dheeraj Ghate BJP – (The Karbhari News Service) – ‘सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने विक्री कायदा २००३’ अन्वये कोणत्याही शाळा, महाविद्यालय वा शिक्षण संस्थेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या विक्रीला बंदी आहे. विद्यार्थ्यांना कोणतेही व्यसन लागू नये, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. पण पुणे शहरातील शाळांबाहेर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत. शाळांच्या जवळ असलेल्या पान टपऱ्यांवर सिगारेट, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ मिळतात. काही विद्यार्थी शाळेला जाताना किंवा शाळा सुटल्यावर इथे जात असल्याचे दिसून आले आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना व्यसन लागण्याची आणि त्यांच्या मनावर व अभ्यासावर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर मंगळवारी पुण्याचे परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त  संदीप सिंह गिल यांची पालकांसह भेट घेतली आणि त्यांच्याकडे पुण्यातील शाळांच्या बाहेरील परिसराची पोलिसांनी पाहणी करून तिथे जर कोणी तंबाखूजन्य पदार्थ विकत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या विषयात लक्ष घालून पोलिसांना आवश्यक निर्देश दिले जातील, असे आश्वासन गिल साहेबांनी दिले आहे.

यावेळी शिष्टमंडळामध्ये घाटे यांच्यासह पुणे शहर भारतीय जनता पार्टी युवती आघाडी अध्यक्ष मनीषा धारणे मनीषा सानप आनंद पाटील प्रशांत सुर्वे विजय गायकवाड अमर आवळे पुष्कर तुळजापूरकर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बुवाबाजी करून राजकारणाला बट्टा लावणाऱ्या पटोलेंनी राजीनामा द्यावा! | भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे यांची मागणी

 

अनेक निवडणुकांमधील सततच्या पराभवांनंतर लोकसभा निवडणुकीत दिसलेला आशेचा एक किरण कॉंग्रेसमधील सरंजामशाहीला नवसंजीवनी देणारा ठरला असून गांधी घराण्यातील नेतापूजनाची परंपरा पटोले पूजनापर्यंत पोहोचल्याचे आता पहावयास मिळत आहे. पराजयातही विजयाच्या उन्मादाने उन्मत्त झालेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चक्क कार्यकर्त्याकरवी पाद्यपूजा करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासणारा असून याचे जाहीर प्रदर्शन करणाऱ्या नाना पटोलेंनी ताबडतोब पदाचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घ्यावा अशी मागणी भाजपाचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

देशाच्या राजकारणात कॉंग्रेसने व्यक्तिपूजेची परंपरा सुरू केली. गांधी घराण्याचे हुजरे यामध्ये आघाडीवर राहिले. याच परंपरेचा शिरकाव कॉंग्रेसमध्ये तळागाळात पोहोचला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय चक्क कार्यकर्त्यांनी पाण्याने धुतल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे समोर आला आहे. अनेक निवडणुकांत सातत्याने होणाऱ्या पराभवानंतर काही जागांवर मिळालेल्या यशामुळे हुरळून गेलेल्या पटोले यांच्या अशा सरंजामशाहीला महाराष्ट्राच्या राजकारणात थारा दिला जाणार नाही, असेही श्री. घाटे यांनी या पत्रकात म्हटले आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेस बट्टा लावणाऱ्या या कृतीबद्दल प्रायश्चित्त म्हणून पटोले यांनी राजकीय संन्यास घेऊन बुवाबाजी सुरू करावी व कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर पाणी सोडावे, अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारू असा इशाराही त्यांनी या पत्रकात दिला आहे.