तात्काळ पाणी वापर कमी करा; अन्यथा सर्वस्वी जबाबदारी तुमची !
: पाटबंधारे विभागाचा महापालिका आयुक्तांना इशारा
: काय आहे पत्र?
पुणे महानगरपालिकेने भामा आसखेड धरणातून पाणीवापर सुरू केल्याने खडकवासला धरणातील दैनंदिन पाणीवापर तात्काळ नियंत्रित/कमी करण्याबाबत खडकवासला प्रकल्पाच्या रब्बी हंगामाच्या कालवा सल्लागार समितीच्या दि. २२.०१.२०२१ रोजीच्या व उन्हाळा हंगामासाठी दि.
२६.०३.२०२१ रोजी झालेल्या बैठकीत मा. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री, पुणे जिल्हा तसेच अध्यक्ष, का.स.स. यांनी
निर्देश दिलेले होते. तथापि अद्यापपर्यंत पुणे महानगरपालिकेने खडकवासला धरणातील पुणे महानगरपालिकेचा दैनंदिन पाणीवापर नियंत्रित/कमी केलेला नाही. आता खडकवासला संयुक्त प्रकल्पात मर्यादित पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यानुसार पूर्ण वर्षभरासाठी १५ जुलै २२ अखेरपर्यंत पिण्यासाठी व सिंचनासाठी उपलब्ध पाणीसाठ्यातून काटेकोर पाणीनियोजन करणे आवश्यक आहे. त्याकरिता आतापासून पुणे महानगरपालिकेने अत्यंत काटकसरीने पाणी वापर करणे आवश्यक आहे. खडकवासला प्रकल्पाच्या १५ ऑक्टोबरच्या पाणीसाठ्यावर रब्बी व उन्हाळा हंगामाचे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सिंचनाच्या पाणीवापराचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुणे मनपाचा भामा असाखेड धरणातील मंजूर आरक्षणानुसार दैनंदिन २०० MLD पाणीवापर गृहीत धरून पुणे महानगरपालिकेच्या सन २०२१-२२ च्या मंजूर वार्षिक पाणीवापराच्या अंदाजपत्रकानुसार अनुज्ञेय (१०.९०टीएमसी) पाणीवापरानुसार वर्षभरासाठी पुणे महानगरपालिकेस लागणारे पाणी परिगणित करून उर्वरित पाणी सिंचनाकरिता वापरण्यासाठी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत नियोजन करण्यात येणार आहे.
त्यामुळे पुणे महानगरपालिकेने जरी पाणीवापर नियंत्रित/कमी केला नाही, तरी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील नियोजनानुसार रब्बी व उन्हाळा हंगामात शेतीला सिंचनासाठीपाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने धरणात पिण्यासाठी मर्यादित पाणीसाठा उन्हाळा अखेरीस उपलब्ध असणार आहे. त्यामुळे पुणे शहरास माहे जून- जुलै २०२२ मध्ये पिण्यासाठी कमी पाणीसाठा उपलब्ध राहणार आहे व त्यामुळे पुणे शहरात उन्हाळा अखेरीस पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे.
यास्तव पुणे शहराचा दैनंदिन पाणीवापर आतापासून अत्यंत काटकसरीने करणे आवश्यक आहे. अन्यथा उन्हाळ्यात पुणे शहरास उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी उपलब्ध न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पुणे महानगरपालिकेची राहील.
COMMENTS