Pune Municipal Corporation (PMC) – पावसाळा दरम्यानच्या कामात तांत्रिक संवर्गातील सेवक व संबधित महापालिका सहाय्यक आयुक्त यांच्यात समन्वय महत्वाचा | महापालिका आयुक्तांनी काय दिले आदेश?

HomeBreaking Newsपुणे

Pune Municipal Corporation (PMC) – पावसाळा दरम्यानच्या कामात तांत्रिक संवर्गातील सेवक व संबधित महापालिका सहाय्यक आयुक्त यांच्यात समन्वय महत्वाचा | महापालिका आयुक्तांनी काय दिले आदेश?

गणेश मुळे Jun 15, 2024 12:21 PM

PMC Assistant Commissioner | सहाय्यक आयुक्तांचे अधिकार वाढवले | मुख्य खाते आणि क्षेत्रीय कार्यालयात समन्वय राखण्यासाठी महापालिका आयुक्तांचा निर्णय!
Dr Rajendra Bhosale IAS | पावसाळ्यात आकस्मिक परिस्थितीत आवश्यकता भासल्यास स्वच्छ संस्थेतील सेवकांना नियुक्त केले जाणार 
PMC RTI Nodal Officer | सामान्य प्रशासन विभागाला नकोय माहिती अधिकाराचे काम!

Pune Municipal Corporation (PMC) – पावसाळा दरम्यानच्या कामात तांत्रिक संवर्गातील सेवक व संबधित महापालिका सहाय्यक आयुक्त यांच्यात समन्वय महत्वाचा | महापालिका आयुक्तांनी काय दिले आदेश?

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पावसाळा दरम्यानच्या कामात तांत्रिक संवर्गातील सेवक जसे कि कनिष्ठ अभियंता (PMC JE) आणि उप अभियंता (PMC Deputy Engineer) आणि संबधित महापालिका सहाय्यक आयुक्त यांच्यात समन्वय महत्वाचा आहे. असे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी म्हटले आहे. तसेच त्यांच्या कामकाजाबाबत नियमावली ठरवून दिली आहे. नुकतेच याबाबतचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. (PMC Pune Municipal Corporation)

महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्यादरम्यान पाणी साचणे, वृक्ष उन्मळून पडणे, मलवाहिन्या तसेच पावसाळी वाहिन्यात गाळ साचणे, ड्रेनेज चेंबरच्या जाळ्यावर कचरा साचणे इत्यादी अनेक समस्या उदभवत असतात. याप्रसंगी महानगरपालिकेची क्षेत्रिय कार्यालय तसेच मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, पथ विभाग, उद्यान विभाग, प्रकल्प विभाग, विद्युत विभाग इत्यादी मुख्य खात्याकडून करण्यात येणारी कामे व त्यांच्याकडील कायम स्वरूपी तसेच कंत्राटी मनुष्य बळ देखील क्षेत्रिय स्तरावर कार्यरत करण्यात येते. अशा वेळी पावसाळा कालावधीत  विविध खाते तसेच क्षेत्रिय कार्यालयात कार्यरत तांत्रिक संवर्गातील सेवक व संबधित महापालिका सहाय्यक आयुक्त यांचेतील समन्वय हा महत्वाचा मुद्दा आहे. यासाठी महानगरपालिकेच्या मुख्य खात्याकडील क्षेत्रिय स्तरावर कार्यरत कनिष्ठ अभियंता, उप अभियंता, मुख्य खात्यातील वरिष्ठांसह परिमंडळ उप आयुक्त यांचेशी दैनंदिन संपर्कात राहून समन्वय साधून पावसाळयादरम्यान करावयाची विविध कामे तसेच बचाव व मदत कार्याचे कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. जेणेकरून नागरिकांना तातडीने दिलासा देता येणे शक्य होईल.

| अशी असणार आहे नियमावली

१. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य खात्याकडील क्षेत्रिय स्तरावर कार्यरत असणारे तांत्रिक सेवक जसे कनिष्ठ

अभियंता, उप अभियंता यांनी पावसाळा कालावधीत संबधित महापलिका सहाय्यक आयुक्त, परिमंडळ उप आयुक्त, यांचेशी समन्वय साधून त्यांच्या कार्यक्षेत्रातील कामकाज करावे.
२. मुख्य खात्याच्या ज्या सेवकांकडून समन्वय तसेच आपत्ती व्यवस्थापनाकामी नेमून दिलेल्या कर्त्यव्यात कसूर करण्यात येईल अशा सेवक, अधिकारी यांचेबद्दल संबधित परिमंडळ उप आयुक्त यांनी संबंधित खातेप्रमुख व संबंधित आयुक्त यांचे निदर्शनास आणावे.
३. सदरच्या सर्व खातेप्रमुखांनी सदरचे आदेश त्यांच्या अधिनस्त क्षेत्रिय सेवक / अधिकारी यांच्या तात्काळ निदर्शनास आणावेत व आदेशाची अंमलबजावणी सुनिश्चित करावी.