Pune Congress on Pune Rain | मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे काँग्रेसने महापालिका आयुक्तांकडे केल्या या मागण्या! 

HomeBreaking Newsपुणे

Pune Congress on Pune Rain | मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे काँग्रेसने महापालिका आयुक्तांकडे केल्या या मागण्या! 

गणेश मुळे Jun 10, 2024 4:34 PM

Chief Auditor objection | ‘उज्वल  प्रकाशात’, ‘महापालिका अंधारात!’ | टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनी कडून पुणे मनपाचे आर्थिक नुकसान | मुख्य लेखापरीक्षकांनी आक्षेप काढत कंपनी कडून  १५ कोटी वसूल करण्याचे दिले आदेश | विद्युत विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत
PMC Pune | सुरेखा भणगे यांच्याकडे धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी 
Pune Sex Ratio | सावित्रीबाईंच्या पुण्यात 1 हजार मुलांमागे फक्त 890 मुली! 

Pune Congress on Pune Rain | मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे काँग्रेसने महापालिका आयुक्तांकडे केल्या या मागण्या!

 

Pune Congres – PMC Pune – (The Karbhari News Service) – पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये पुणे शहरात पावसाळी परिस्थितीमुळे उद्‌भवलेला हाहाकार व नागरिकांची होणारी प्रचंड गैरसोय या बबातची जाणीव मा. आयुक्त यांना करून देण्यात आली. निवेदन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

नाल्याच्या कडेला व पात्रात झालेली गुंठेवारीतील बांधकामे, पुराच्या पाण्याचा लोंढा जाण्यासाठी नाल्याचे अपुरे पात्र, मैलापाणी वाहून आणणारे नाल्यातील चेंबर्स, पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचा अभाव, चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेले ‘कल्व्हर्ट्स’ यामुळे शहरात एकजरी जोरदार पावूस झाल्यास पूरस्थिती निर्माण होतें हा गेल्या तीन चार वर्षांपासून पुणे शहराच्या अवस्थेचा अनुभव असतानाही पुणेकरांच्या नशिबी मान्सून काळात वारंवार
पूरस्थिती, वाहतूक कोंडी व वित्तीय हानी यांना हतबलतेणे सामोरे जायचे एव्हढेच राहिले आहे. असा आरोप कॉंग्रेस कडून करण्यात आला.

पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने खालील मागण्या आयुक्त पुणे मनपा यांच्याकडे करण्यात  आल्या 

१) मान्सूनपूर्व व मान्सून कालावधीतील सर्व कामे आयुक्त स्तरावरून दक्षता विभागाच्या निगराणीखाली करण्यात यावी.
२) चुकीच्या पद्धतीने नाले वळवल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरात पाणी जाण्याचे प्रकार घडत असल्यामुळे आयुक्तांच्या अधिकारात नाला वळवण्यास दिलेल्या सर्व परवानग्या रद्दबातल करून नाल्यांचा प्रवाह नैसर्गिक परिस्थिती प्रमाणे पूर्ववत करण्यात यावा.
३) पुणे शहरातील नाल्यातील चौकातील फुटपात वरील अतिक्रमणे तातडीने काढून टाकण्यात यावे.
४) पुणे शहरातील साईड मार्जिन फ्रंट मार्जिन नालापात्र इमारतीच्या टेरेसवर निकषाशी विसंगत असलेल्या सर्व जाहिरात फलकांवर युद्ध स्तरावर कारवाई करण्यात यावी.
५) शहरात जागोजागी रस्त्यांवर खड्डे पाडायचे प्रमाण वाढले असल्याने रस्त्यावर खड्डे पडल्यास रातोरात सदर खड्डे बुजवण्याची यंत्रणा उभी करून रस्ते खड्डे मुक्त ठेवण्यात यावेत.

 

     यावेळी माजी आमदार रमेश बागवे, दिप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, कमल व्‍यवहारे, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, अविनाश बागवे, अजित दरेकर, रफिक शेख, लता राजगुरू, सुजात शेट्टी, महिला अध्यक्षा पुजा आनंद, समीर शेख, संतोष आरडे, सुनिल शिंदे, युवक अध्यक्ष राहुल शिरसाट, मेहबुब नदाफ, सुजित यादव, हेमंत राजभोज, रमेश सकट, अक्षय माने, रमेश सोनकांबळे, राजेंद्र भुतडा, द. स. पोळेकर, बाळासाहेब अमराळे, सतिश पवार, प्रदिप परदेशी, रवि ननावरे, राजेंद्र शिरसाट, जयसिंग भोसले, शिवराज भोकरे, आशितोष शिंदे, सुंदर ओव्‍हाळ, प्रकाश पवार, सुनिल घाडगे, रवि पाटोळे, ऋषिकेश बालगुडे, महेश हराळे, नारायण पाटोळे, रवि आरडे आदींसह काँग्रेस नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.