Katraj-Kondhwa Road Incident | आजी माजी आमदारामुळे कात्रज-कोंढवा रस्ता झाला मृत्यूचा सापळा! – प्रशांत जगताप

HomeBreaking Newsपुणे

Katraj-Kondhwa Road Incident | आजी माजी आमदारामुळे कात्रज-कोंढवा रस्ता झाला मृत्यूचा सापळा! – प्रशांत जगताप

गणेश मुळे Jun 08, 2024 3:06 PM

Ajit Pawar | अजित पवार यांच्याकडून मांजरी बु. येथील विविध विकासकामांची पाहणी
Pune Congress | Vidhansabha Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी पुणे काँग्रेस इच्छुकांकडून मागवणार अर्ज! | 5 ऑगस्ट पर्यंत मुदत
Hadapsar Vidhansabha Constituency | नरेंद्र मोदी सभा : हडपसर विधानसभा मतदार संघातून 6 हजाराहून अधिक लोक उपस्थित राहणार! | शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची माहिती 

Katraj-Kondhwa Road Incident | आजी माजी आमदारामुळे कात्रज-कोंढवा रस्ता झाला मृत्यूचा सापळा! – प्रशांत जगताप

| रस्त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मुलीचा मृत्यू

 

Prashant Jagtap – (The Karbhari News Service) – हडपसर विधानसभा मतदारसंघातील (Hadapsar Vidhansabha Constituency) कात्रज कोंढवा रस्त्याच्या  (Katraj-Kondhwa Road) कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचून त्यात चार मुली बुडाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. यातील ३ मुलींना वाचवण्यात यश आले असून एका मुलीचा मात्र मृत्यू झाला आहे.  या दुर्घटनेबद्दल संताप व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आजी – माजी आमदारांना खडेबोल सुनावले. (Pune News)

हडपसर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार व फुटीर पक्षाचे विद्यमान आमदार यांच्यातील श्रेयवादाच्या लढाईमुळे हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा झाला आहे. मर्जीतील ठेकेदाराचे भले करण्याच्या नादात गेल्या काही वर्षात शेकडो नागरिकांना या रस्त्यावर आपले प्राण गमवावे लागले.

असंख्य नागरिकांच्या रक्ताने लाल झालेला हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा व रस्त्याचे काम सुरू असताना धोकादायक ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी पुरेपूर काळजी घ्यावी व कात्रज-कोंढवा रस्त्यावर झालेल्या दुर्घटनेस जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी प्रशांत जगताप यांनी केली.