Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी | आमदार राम सातपुते

HomeपुणेBreaking News

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी | आमदार राम सातपुते

गणेश मुळे May 29, 2024 2:30 PM

Mukta Tilak Death Anniversary | पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यात येईल| चंद्रकांत पाटील
Pune BJP | शाळांच्या बाहेरील पान टपऱ्यावर तातडीने कारवाई करा | धीरज घाटे
BJP focus on PMC Election | महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी ऍक्शन मोड वर

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी | आमदार राम सातपुते

 

Jitendra Awhad – Mansmriti – (The Karbhari News Servcie) –  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्या समोर झालेल्या आंदोलनात मस्तवाल पणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली, त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आज तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले. (Jitendra Awhad on Manusmriti)

यावेळी बोलताना आमदार सुनील कांबळे म्हणाले की ज्यांच्या पक्षाचे नेते पदोपदी शाहू फुले आंबेडकर यांच्या नावे राजकारण करत असतात त्यांच्या पक्षातील विकृत आमदारावर कथाकथित जाणते राजे कारवाई करणार का असा सवाल आमदार कांबळे यांनी केला.

आमदार सातपुते म्हणाले की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार आहे, अशी वल्गना केली परंतु प्रत्यक्षात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून त्यांनी नक्की महाविकास आघाडीची मानसिकता स्पष्ट झाली आहे. हे कृत्य म्हणजे देशाचा अपमान आहे त्यामुळे जितेंद्र आव्हाड या विकृतावर तातडीने राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही करत आहोत.

शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की जितेंद्र आव्हाड ही विकृती आहे ही विकृती भारतीय जनता पार्टी ठेचून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही. आव्हाड यांना पुण्याच्या अनुभव आहे त्यामुळे जर कारवाई झाली नाही तर जितेंद्र आव्हाडला पुण्यात फिरू देणार नाही. असा इशारा घाटे यांनी दिला.
यावेळी आमदार सुनील कांबळे, आमदार राम सातपुते शहराध्यक्ष धीरज घाटे , अनुसूचित मोर्चाचे अध्यक्ष भीमराव साठे , सरचिटणीस राघवेंद्र मानकर माजी नगरसेवक दीपक पोटे, राजेश येनपुरे किरण कांबळे अतुल साळवे राजेंद्र काकडे गणेश यादव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.