Pune Water Cut on Friday | देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवताय, तर त्याचे तपशील जाहीर करा

HomeपुणेBreaking News

Pune Water Cut on Friday | देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवताय, तर त्याचे तपशील जाहीर करा

गणेश मुळे May 22, 2024 6:37 AM

Dr Rajendra Bhosale IAS | तर या प्रकरणात खातेप्रमुखांना धरले जाणार व्यक्तीश: जबाबदार! | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचा इशारा 
Dr Rajendra Bhosale IAS | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांची पाणी शिरलेल्या भागात भेट
Dr Rajendra Bhosale IAS | पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी पाच मानाच्या गणपतींचे दर्शन घेऊन केली पूजा!

Pune Water Cut on Friday | देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवताय, तर त्याचे तपशील जाहीर करा

| सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांची मागणी

 Pune Water cut Latest News – (The Karbhari News Service) – संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा येत्या शुक्रवारी देखभाल दुरुस्ती साठी बंद राहणार आहे. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) पाणीकपात करत असेल तर त्याचे तपशील महापालिकेने जाहीर करावेत. अशी मागणी सजग नागरिक मंचाच्या विवेक वेलणकर (Vivek Velankar Sajag Nagrik Manch) यांनी महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांच्याकडे केली आहे. (Pune Water Supply)
 वेलणकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे कि,    संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा येत्या शुक्रवारी देखभाल दुरुस्ती साठी बंद राहणार असल्याचे महापालिकेने घोषित केले आहे. निवडणूकां नंतर हे सुरु होईल असं भाकीत आम्ही केलं होतंच. याआधी ४ एप्रिल च्या गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती साठी बंद ठेवण्यात आला होता. त्यावेळी नक्की काय देखभाल दुरुस्ती झाली याचे तपशील जाहीर झाले नाहीत. पण पुढचे दोन दिवस पुणेकरांचे अतोनात हाल झाले आणि टॅंकरवाल्यांची चंगळ झाली. आत्ताचा पाणीपुरवठा बंद म्हणजे अघोषित पाणीकपात नाही असे महापालिका प्रशासन म्हणत असले तरी ते वर्तणुकीतून दाखवून द्यावे लागेल. असे वेलणकर यांनी म्हटले आहे.
नक्की काय देखभाल दुरुस्ती झाली याचे तपशील जाहीर करावे लागतील. आता जुलै च्या पहिल्या आठवड्याशिवाय पुन्हा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवता येणार नाही. कारण याआधीच्या शहरव्यापी पाणीपुरवठा बंद नंतर सहा आठवडे देखभाल दुरुस्ती साठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याची वेळ आली नव्हती.
विवेक वेलणकर,  अध्यक्ष,  सजग नागरिक मंच, पुणे