Pramod Nana Bhangire | पुणे शहरातील निर्जीव झालेल्या झाडांची छाटणी व पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज लाईन स्वच्छता मोहीम राबवावी   | प्रमोद नाना भानगिरे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

HomeBreaking Newsपुणे

Pramod Nana Bhangire | पुणे शहरातील निर्जीव झालेल्या झाडांची छाटणी व पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज लाईन स्वच्छता मोहीम राबवावी | प्रमोद नाना भानगिरे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

गणेश मुळे May 20, 2024 9:53 AM

Holidays List in New Year 2024 | PMC | नवीन वर्षात फक्त २० सुट्ट्या | शनिवार रविवार मध्ये ७ सुट्ट्या जाणार 
Latest News on Water cuts in Pune |  Now from May 18, water will be shut off in the entire city of Pune every Thursday
PMC Pune Town Planning Scheme | फुरसुंगी, उरुळी देवाची टीपी स्किममधील जमीन मालकांचे अंशदान केले जाणार माफ

Pramod Nana Bhangire | पुणे शहरातील निर्जीव झालेल्या झाडांची छाटणी व पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज लाईन स्वच्छता मोहीम राबवावी

| प्रमोद नाना भानगिरे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

Pre Monsoon work in Pune – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील निर्जीव झालेल्या झाडांची छाटणी व पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज लाईन स्वच्छता मोहीम राबवावी. अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana  Bhangire Shivsena) यांची महापालिका आयुक्तांकडे (PMC Commissioner) केली आहे. यावर अंमल नाही झाला तर आंदोलन करण्याचा इशारा भानगिरे यांनी दिला आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
भानगिरे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार गेल्या काही दिवसात पुणे शहरात अचानक मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस झाला ज्यात अनेक ठिकाणी निर्जीव असलेले वृक्ष उन्मळून पडलेले, तसेच ड्रेनेज लाईन तुंबलेली आढळून येत आहे. हडपसर मतदार संघातील प्रभाग क्रमांक 26 विविध ठिकाणी मोठ्‌या प्रमाणावर निर्जीव व जीर्ण वृक्षांची संख्या मोठ्‌या प्रमाणावर असून अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्ष कोसळून जीवित हानी होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 26 मधील विविध ठिकाणी जीर्ण झालेल्या वृक्षांची कटाई तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या मोठ्या झाडांची छाटणी करणे अत्यावश्यक आहे.
भानगिरे यांनी म्हटले आहे कि, तातडीने या संदर्भात संबंधितांना सुचित करावे. तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणावर आलेल्या मुसळधार पावसाने ठिकठिकाणी ड्रेनेज लाईन तुंबलेली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. तरी तातडीने पुणे महानगरपालिकेच्या वतीने ड्रेनेज लाईन स्वच्छता मोहीम हडपसर मतदार संघात राबविण्यात यावी जेणेकरून पावसाळ्यापूर्वीच ड्रेनेज लाईन स्वच्छता मोहीम पूर्ण होवून नागरिकांचे स्वास्थ्य धोक्यात येणार नाही.
अनेक वेळा प्रशासनाच्या विलंबामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी संपूर्ण पूणे शहरातील तात्काळ निर्जीव झालेल्या वृक्षांची छाटणी
तसेच ड्रेनेज लाईन स्वच्छतेबाबत संबंधितांना तातडीने सूचना कराव्यात. अन्यथा पुणे शहर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा भानगिरे यांनी दिला आहे.