PMC PT 3 Application | PT 3 अर्ज भरण्यासाठी नागरिकांना जून पर्यंत मुदत देण्याच्या हालचाली | प्रॉपर्टी टॅक्स विभागाची महापालिका आयुक्तांकडे मागणी

HomeBreaking Newsपुणे

PMC PT 3 Application | PT 3 अर्ज भरण्यासाठी नागरिकांना जून पर्यंत मुदत देण्याच्या हालचाली | प्रॉपर्टी टॅक्स विभागाची महापालिका आयुक्तांकडे मागणी

गणेश मुळे Apr 30, 2024 11:12 AM

 PT-3 application deadline extended till 15th August |  PMC took important decisions regarding 40% discount
Pune Property Tax | प्रॉपर्टी टॅक्स मधून पुणे महापालिकेच्या तिजोरीत 2273 कोटी जमा | मागील वर्षीपेक्षा 308 कोटी ने अधिक उत्पन्न
Pune Property Tax Abhay Yojana | मिळकतकर अभय योजनेचा फायदा घेतलेल्यांपैकी निम्मे मालमत्ताधारक पुन्हा थकबाकीदार | अभय योजनेने पालिकेचे 275 कोटींचे नुकसान

PMC PT 3 Application | PT 3 अर्ज भरण्यासाठी नागरिकांना जून पर्यंत मुदत देण्याच्या हालचाली | प्रॉपर्टी टॅक्स विभागाची महापालिका आयुक्तांकडे मागणी

PMC PT 3 form | Pune Property tax | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) कर आकारणी विभागाचे फॉर्म PT-3 (PMC Property tax Department PT 3 Form) भरून देण्यासाठी जून महिन्यापर्यंत मुदत देण्याच्या हालचाली महापालिकेत सुरु आहेत. याबाबत प्रॉपर्टी टॅक्स विभागाने महापालिका आयुक्तांकडे अतिरिक्त आयुक्तांच्या माध्यमातून निवेदन सादर केले आहे. शिवाय अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांच्याकडे देखील नुकतीच याबाबत बैठक झाली. यात विभागाने मुदत वाढवून देण्याबाबत मागणी केली आहे. त्यानुसार आता महापालिका आयुक्त अंतिम निर्णय घेणार आहेत.
मागील वर्षी महापालिकेने मुदत वाढवून दिली होती. मुदत 15 नोव्हेंबर रोजी संपत होती.  मात्र दिवाळीची सुट्टी आणि नागरिकांची मागणी पाहता ही मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत वाढवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला होता. दरम्यान या कालावधीत महापालिकेकडे फक्त 87 हजार अर्ज प्राप्त झाले. म्हणावा तसा प्रतिसाद महापालिकेला मिळाला नव्हता.
  पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation) केवळ निवासी मिळकतींना (Residential property) स्वःवापराकरिता देण्यात येणारी ४०% सवलत (40% Discount) कायम करण्यात आली आहे. ज्या नव्याने बांधकाम झालेल्या निवासी मिळकतींची आकारणी ४०% सवलत न देता ०१.०४.२०१९ पासून पुढे झालेली आहे त्या सर्व मिळकतींना व ज्या मिळकतींची ४०% सवलत जी.आय.एस. सर्व्हे अंतर्गत दि.०१.०४.२०१८ पासून रद्द करण्यात आली आहे व अशा मिळकतींना ह्यापूर्वी फरकाची देयके (PMC property Tax bill) पाठवण्यात आली होती अशा सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता देण्यात येत आहे. (PMC property Tax)
वरील सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ आकारणी दिनांक/दुरुस्ती दिनांकापासून (म्हणजेच ज्या निवासी मिळकतींना दि. ०१.०४.२०१८ पासून दि. ३१.०३.२०२३ पर्यंत सवलत देय आहे परंतु दिली गेलेली नाही) ती सवलत घेणेकरिता व देण्यात आलेली सवलत ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता सुरु राहणेकरिता मिळकतधारकाने PT-३ अर्ज (PT 3application form) संपूर्ण पुराव्यांसह १५ नोव्हेंबर २०२३ पूर्वी कर आकारणी व कर संकलन (pmc pune property Tax department) खात्याकडे सादर करणे आवश्यक राहील. असे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. संबंधित मिळकतधारकांनी संपूर्ण मिळकतकर भरला असल्यास जादा जमा होणारी रक्कम PT-३ अर्ज भरून दिलेनंतर पुढील ४ वर्षांचे समान हप्त्यात आर्थिक वर्षाच्या देयकातून समायोजित करण्यात येईल. विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास मिळकतीचा वापर मिळकतधारक स्वः वापराकरिता करीत नसल्याचे गृहीत धरून अशा मिळकतीची सन २०२३-२४ करिता दिली गेलेली सवलत रद्द करण्यात येईल. असे महापालिकेने म्हटले होते.
दरम्यान 40% सवलती वरून पुन्हा ओरड सुरु झाली आहे. ज्या लोकांनी PT 3 अर्ज भरला नाही त्यांना नियमाप्रमाणे सवलत न देता व्याजासहित बिले देण्यात आली आहेत. ही रक्कम जास्त असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. विभागाने आवाहन करूनही नागरिकांनी अर्ज भरला नसल्याने ही वेळ आली आहे. त्यामुळे आता खात्यानेच पुढाकार घेऊन अर्ज भरून देण्यासाठी नागरिकांना मुदत देण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.