PM Modi Pune Tour | पंतप्रधान मोदींच्या सभेला महायुतीचे दोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील | प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांची माहिती 

HomeपुणेBreaking News

PM Modi Pune Tour | पंतप्रधान मोदींच्या सभेला महायुतीचे दोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील | प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांची माहिती 

गणेश मुळे Apr 27, 2024 2:14 PM

Kasba by-election | कसबा पोटनिवडणूक सर्वांना सोबत घेऊनच जिंकणार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन
PM Modi Pune Tour | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी महायुतीची जय्यत तयारी पूर्णत्वास | केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सभास्थळ पाहणी
Sandeep Khardekar | महाविकास आघाडीने राज्यात अराजक सदृश परिस्थिती निर्माण न करता उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे | भाजपा प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांचे आवाहन

PM Modi Pune Tour | पंतप्रधान मोदींच्या सभेला महायुतीचे दोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील | प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांची माहिती

 

PM Modi Pune Tour – (The Karbhari News Service) –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविजय संकल्प सभेचे आयोजन येत्या 29 एप्रिल रोजी वानवडी येथील रेस कोर्स मैदान येथे सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी करण्यात आले आहे. या सभेला महायुतीचे दोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी माहिती प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी दिली. (Pune Loksabha Election)

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसनेचे शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख संजय भोसले, मनसेचे अध्यक्ष साईनाथ बाबर, आरपीआयचे अध्यक्ष संजय सोनावणे, पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, महायुती समन्वयक संदीप खर्डेकर, राजेंद्र शिळिमकर आदी उपस्थित होते.

पांडे म्हणाले, अनेक वर्षानंतर पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत असून रेसकोर्स याठिकाणी सभेचे आयोजन केले आहे. सभेच्या माध्यमातून महायुतीच्या चारही उमेदवारांची ही महाविजय संकल्प सभा असणार आहे. 128 एकरांमध्ये ही सभा होणार असून या सभेला 2 लाख नागरिक उपस्थित राहणार आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, मनसे, आरपीआय यांच्याबरोबर सर्व सहकारी पक्ष सभेच्या तयारीला लागले आहेत. 21 विधानसभा मतदारसंघामधून सभेसाठी कार्यकर्ते येणार असल्याचे पांडे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्यासह 3 हजार व्हीआयपी यासभेला उपस्थित राहणार आहेत. सभेसाठी आठ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना समाज माध्यमातून गुगल लिंक पाठवण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांचे पार्किंग कोठे आहे ते त्यांना समजेल. कार्यकर्त्यांनी येताना पाण्याची बाटली आणू नये. पाण्याची सोय मैदानात करण्यात आली आहे. 22 ठिकाणी एलइडी लावण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी येण्यापुर्वी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व दरवाजे बंद करण्यात येतील. त्यामुळे नागरिक आणि कार्यकर्त्यांनी 4 वाजून 30 मिनिटापर्यंत सभेच्या ठिकाणी पोहचावे असे पांडे यांनी सांगितले.