Mahamadwadi Water Issue | महंमदवाडी कौसरबाग परिसरात होत असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्या वरून शिवसेना करणार आंदोलन
| शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची माहिती
Pramod Nana Bhangire- (The Karbhari News Service) प्रभाग क्र.२६ महंमदवाडी कौसरबाग मध्ये कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने 10 एप्रिल रोजी महापालिका भवन मध्ये तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत प्रशासनाला सोमवार पर्यंतची मुदत दिली आहे. अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली. तसेच याबाबत महापालिका प्रशासनासोबत देखील पत्रव्यवहार करण्यात आला आहे. (PMC Water Supply Department)
भानगिरे यांच्या निवेदनानुसार प्रभाग क्र.२६, महंमदवाडी कौसरबाग हा प्रभाग लोकसंखेच्या व क्षेत्रफळाच्या दृष्टिने सर्वात मोठा प्रभाग आहे. बऱ्याच महिन्यापासून प्रभागात पाणीपुरवठा कमी दाबाने व अवेळी होत आहे. अनेक भागांमध्ये मध्यरात्री, अपरात्री, पहाटे पाणीपुरवठा केला जातो. अवेळी पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दोराबजी परिसर, क्लाऊड नाईन, चिंतामणी नगर, गुलाम आली नगर, ससाणे
वस्ती,काळेपडळ,बडदे मळा, दुगड चाळ, हांडेवाडी रोड,ईसीपी वास्तू ड्रीम इस्टेट, ग्रीन सिटी, नमो विहार, ईशरथ बाग,पांगारे मळा, सनश्री साळुंखे विहार, काळेपडळ, महंमदवाडी गावठाण, संपूर्ण हांडेवाडी रोड व इतर भागांमध्ये पाणी वेळेवर न येणे व कमी दाबाने येत आहे.