Pune Municipal Corporation Security Guard | पुणे महापालिका राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेणार 100 सुरक्षारक्षक!
| शहरातील पाण्याच्या टाक्या आणि उद्यानात केले जाणार तैनात
Pune Municipal Corporation Security Guard – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या वतीने राज्य सुरक्षा महामंडळाकडून 100 सुरक्षा रक्षक घेण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव सुरक्षा विभागाने तयार केला असून तो सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच याबाबतची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. मागील वर्षी देखील महापालिकेने 100 सुरक्षा रक्षक घेतले होते.
पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत असून ती निष्कासित करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रस्ता पदपथावर (Footpath) अतिक्रमणे वाढत असून वाहतूक नियोजनाच्या अनुषंगाने ती काढणे आवश्यक आहे. पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) ही “अ” वर्ग दर्जा प्राप्त झालेली महानगरपालिका असून स्मार्ट सिटी शहरामध्ये समावेश झालेला आहे. तसेच पुणे महानगरपालिकेत (PMC Pune) यापूर्वी ११ व नवीन २३ गावांचा समावेश झाला असलेने पुणे महानगरपालिकेचे क्षेत्रफळ वाढले आहे. त्यामुळे अतिक्रमण कारवाई करण्यासाठी मागील वर्षी महामंडळाकडून 100 सुरक्षा रक्षक घेतले होते. (Pune Municipal Corporation Latest News)
त्याचप्रमाणे शहरात पाण्याच्या टाक्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांची सुरक्षा करणे आवश्यक आहे. त्यामुळे या ठिकाणी हे नवीन सुरक्षा रक्षक देण्यात येतील. तसेच महापालिकेची उद्याने, राजीव गांधी ई लर्निंग स्कुल, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय या ठिकाणी देखील हे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येतील. याबाबतचा प्रस्ताव सुरक्षा विभागाने तयार केला असून तो सामान्य प्रशासन विभागाकडे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या पोलीस भरती प्रक्रियेत प्रतीक्षा यादीवर असणाऱ्या उमेदवारांना सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्याची संधी दिली जाते. राज्य सुरक्षा महामंडळाकडून हे उमेदवार ठेका पद्धतीने घेतले जातात.
—–