Prithviraj B P IAS | सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणार | पृथ्वीराज बी पी यांनी स्वीकारला अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) पदाचा पदभार

HomeBreaking Newsपुणे

Prithviraj B P IAS | सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणार | पृथ्वीराज बी पी यांनी स्वीकारला अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) पदाचा पदभार

गणेश मुळे Mar 20, 2024 1:01 PM

PEHEL 2024 Pune PMC | पेहेल-२०२४ |  4 तासात 53 टन ई-कचरा आणि प्लॅस्टिक जमा
Transfer of IAS Dr. Kunal Khemnar! | Prithviraj BP is the new Additional Commissioner of Pune Municipal Corporation
Pune 5 Star City | PMC | पुणे शहर झाले आता 5 स्टार! | पुणे महापालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

Prithviraj B P IAS | सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणार | पृथ्वीराज बी पी यांनी स्वीकारला अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) पदाचा पदभार

 

Prithviraj B P IAS – (The Karbhari News Service) –  पुणे महानगरपालिका अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) पदाचा (Pune Municipal Corporation Additional Commissioner) पदभार  पृथ्वीराज बी.पी.  (Prithviraj B P IAS ) यांनी  डॉ. कुणाल खेमनार (Dr Kunal Khemnar IAS) यांचे कडून आज  स्वीकारला.

डॉ. कुणाल खेमनार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. पुणे महानगरपालिका अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) पदाचा पदभार  पृथ्वीराज यांनी स्वीकारल्या नंतर, त्यांनी सांगितले कि, पुणे महानगर पालिकेत काम करण्याची उत्तम संधी मिळालेली आहे.  सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

या प्रसंगी  अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज ) रवींद्र बिनवडे (Ravindra Binwade IAS) उपस्थित होते.

The Karbhari - Prithviraj B P Ias

पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहणारे डॉ कुणाल खेमनार (Dr Kunal Khemnar IAS) यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्य सरकारने महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांची नियुक्ती केली आहे.
डॉ खेमनार यांचा कालावधी पूर्ण होऊन बराच कालावधी झाला होता. अखेर सरकारने त्यांची बदली केली आहे. डॉ खेमनार यांची सरकारने साखर आयुक्त, पुणे या ठिकाणी बदली केली आहे. त्यामुळे डॉ खेमनार हे पुण्यातच राहणार आहेत. दरम्यान डॉ खेमनार यांची जागा रिक्त झाल्यानंतर राज्य सरकारने पुणे महापालिकेला तात्काळ नवीन अतिरिक्त आयुक्त दिले आहेत. सरकारने पृथ्वीराज बी पी यांची पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती केली आहे. पृथ्वीराज हे नागपूर स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते.