VIkas Dhakane PMC | पुण्याच्या विकासासाठी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासारखे अधिकारी पुणे महापालिकेत राहणे गरजेचे! 

HomeBreaking Newsपुणे

VIkas Dhakane PMC | पुण्याच्या विकासासाठी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासारखे अधिकारी पुणे महापालिकेत राहणे गरजेचे! 

गणेश मुळे Mar 20, 2024 7:13 AM

Pune Municipal Corporation | सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकात नोंदीच केल्या नाहीत
PMC Transfer | महापालिकेच्या बदली प्रक्रियेत सरकारने हस्तक्षेप करावा | पुणे काँग्रेस ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पुणेकरांच्या 40% कर सवलतीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार | शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे

VIkas Dhakane PMC | पुण्याच्या विकासासाठी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासारखे अधिकारी पुणे महापालिकेत राहणे गरजेचे!

VIkas Dhakane PMC – (The Karbhari News Service) – पुणे शहर जसं वाढत चाललंय, तसं इथल्या समस्या देखील वाढत चालल्या आहेत. खासकरून पायाभूत सुविधा मिळण्यासाठी नागरिकांना झगडावे लागते. यात महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) महत्वाची भूमिका बजावते. महापालिकेत त्यासाठी सकारात्मक आणि शहर हित जोपासणारे अधिकारी हवे आहेत. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakane) यांच्या रूपाने तसा अधिकारी पुणे महापालिकेला मिळाला. मात्र राज्य सरकारला कदाचित  पुण्याचा विकास नको झाला असेल तर त्यामुळे ढाकणे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची कालावधी पूर्ण होण्याआधीच बदली होतीय. दुसरीकडे 4 वर्ष म्हणजे कालावधी उलटून देखील लवकर बदली केली जात नाही. मात्र शहराच्या विकासाला हितकारक असणारे बदलले जाताहेत. राज्य सरकारच्या या धोरणाचा पुण्यातील नागरिकांकडून विरोध केला जातोय. विकास ढाकणे यांची बदली करू नये. याबाबत शहरातून मागणी होतेय. सरकार यात काही सकारात्मक विचार करणार आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. (Pune PMC News)

पुण्यातील वाहतुकीची समस्या मार्गी लागतेय!

पुणे शहर वाहतुकीच्या समस्येने ग्रस्त आहे. महापालिका दरवर्षी करोडो रुपये खर्च करते, असे असताना देखील म्हणावी तेवढी ही समस्या सुटत नव्हती. विकास ढाकणे यांनी पदभार हाती घेतल्यांनंतर त्यांच्याकडे महापालिकेच्या एकूण 28 खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती. त्यात पथ विभाग हा प्रमुख विभाग होता. ढाकणे यांनी यात लक्ष घातल्यापासून शहरात खूप सकारात्मक बदल घडू लागले. कात्रज कोंढवा रस्त्याची समस्या, मुंढवा चौकातील समस्या, हडपसर, बाणेर, पाषाण, सातारा, नगर रोड सारखे वाहतुकीच्या समस्येने ग्रस्त झालेले रस्ते ढाकणे यांनी केलेल्या कामाने मोकळा श्वास घेऊ लागले आहेत. शहरात प्रमुख 15 रस्त्यांची कामे हातात घेण्यात आली आहेत. यामुळे शहरातील रहदारीची समस्या चांगल्या पद्धतीने सुटणार आहे. मात्र ढाकणे यांच्या बदलीने हे काम अर्धवटच राहील की काय, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.
ढाकणे यांच्या कालावधीतच पुणे महापालिकेच्या शाळांना पुरस्कार मिळाले. महापालिकेच्या शाळा आदर्श करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. त्याचप्रमाणे शहरातील नाट्यगृहे आणि सांस्कृतिक ठिकाणे अद्ययावत कशी होतील, यावर त्यांनी भर दिला. शहराचा विकास म्हणजे दुसरे काय असते? यात सुधारणा घडणे गरजेचे असते. तेच काम ढाकणे चांगल्या पद्धतीने करत होते. मात्र राज्य सरकारला पुण्याचे हे सुख पाहवत नाही की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.
The Karbhari - Vikas Dhakane

– कोण आहेत विकास ढाकणे?

भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील अधिकारी विकास ढाकणे यांची मागील 2 वर्षापुर्वी महापालिकेत नियुक्ती करण्यात आली.   ते सिव्हिल सर्व्हिसेसचे 2008 बॅचचे अधिकारी आहेत.  पीएचडी व्यतिरिक्त त्यांनी एम.ए. (अर्थशास्त्र), बी.एसी.  (कृषी), आणि एल. एल. बी. पदवी प्राप्त केली आहे.
या अगोदर ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्री यांचे विशेष कर्तव्य अधिकारी म्हणूनही काम केले आहे.
     ढाकणे यांना विविध प्रशासकीय पदांवर काम करण्याचा मोठा अनुभव आहे.  त्यांच्या सेवेत त्यांनी भारत सरकारमध्ये केंद्रीय मंत्र्याचे खाजगी सचिव म्हणून काम केले आहे आणि रेल्वेच्या मुंबई, अहमदाबाद, पुणे, सोलापूर विभागांवर सहायक आणि विभागीय सुरक्षा आयुक्त या पदांवर उत्कृष्ट काम केले आहे.
 त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल, त्यांना 2014, 2018 आणि 2019 मध्ये महासंचालक पदक (DG )  पुरस्कार आणि 2021 मध्ये ‘राजीव गांधी प्रशासकीय उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. राजपथ, दिल्ली  येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये त्यांनी परेड कमांडरचा सन्मान पटकावला आहे. त्यांना सर्वोत्कृष्ट प्रोबॅशनरी अधिकारी पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
 वाचन, ट्रेकिंग आणि दिग्दर्शन ही त्यांची विशेष आवड आहे. त्यांनी आत्तापर्यंत पाच नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.याशिवाय विद्यापीठ स्तरावर ऍथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

– पुणे आणि आपल्या कारकिर्दी बाबत ढाकणे यांच्या या आहेत भावना

बदली रद्द होईल नाही होईल पण सगळ्यांचे प्रेम बघून मन खूप भरून आले. रस्ते, शाळा, हॅास्पिटल, क्रीडांगणे, उद्याने,ॲाडिटोरियम यांचा खूप विचारपूर्वक योजनाबध्द कार्यक्रम हाती घेतला होता. काल ॲाफीस झाल्यावर संध्याकाळी सावरकर भवनला भेट दिली. २ नवीन कोर्ट PMC ला मिळतील असा मा न्यायाधीश, उच्च न्यायालय यांचा शब्द रविवारी घेतला होता. तिथे नियोजन केले. नंतर बालगंधर्वला गेलो. इतका सुंदर कायापालट होतोय पाहून खूप आनंदी होतो. VIP room,make up room, नवीन पडदा, लाईट्स, साऊंड खूप बरं वाटलं. VIP room मध्ये बालगंधर्वला आतापर्यंत झालेल्या महत्वाच्या अविस्मरणीय प्रसंगांचं कोलाज करायचं ठरलं.टीव्हीची साईज,मेक अप रूम मध्ये स्टेजवरचं लाईव्ह प्रक्षेपण,प्रत्येक रूममध्ये 5 star हॅाटेलसारखं पासवर्ड/कार्ड लॅाक,गोदरेज तिजोरी,AC चे मॅाडेल अगदी कोहलर/टोटो चे टॅायलेट फिटींग्स लागतायेत.
घरी आलो तर बदलीची ॲार्डर.
असो सरकारी नोकरी म्हणजे हे सगळं आलंच.
ईश्वराने  MPSC नंतर UPSC त उत्तीर्ण केलं हाच खूप मोठा आशीर्वाद. जिकडे बदली मिळेल तिकडे जाऊ. पोलीस, रेल्वे, केंद्रीय मंत्रालय, राज्य मंत्रालय, PCMC, PMC सगळीकडे खूप काही करायलामिळालं. सर्वोत्कृष्ट परिक्षाधीन अधिकारी पासून, तीन वेळेस केंद्रीय मंत्रालयाच्या पुरस्कारापासून तर महाराष्ट्र शासनाचा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रथम पुरस्कार सगळे काही मिळाले. चांगले वरिष्ठ भेटले.
पुण्यात घर आहे. कुठेही गेलो तरी पुण्यासाठी काम चालूच ठेवू. जिकडे जाऊ तिकडे सिस्टीम आणि आपला देश चांगला करण्याचा प्रयत्न करू.