Shivsena UBT Pune |  शहर विद्रूपीकरण करूनही भाजप वर कारवाई का नाही ? शिवसेना (UBT) गटाचा महापालिका आयुक्तांना सवाल 

HomeBreaking Newsपुणे

Shivsena UBT Pune |  शहर विद्रूपीकरण करूनही भाजप वर कारवाई का नाही ? शिवसेना (UBT) गटाचा महापालिका आयुक्तांना सवाल 

गणेश मुळे Mar 19, 2024 1:53 PM

Rekha Tingre | राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे भाजपात 
Shivsena Vs BJP | CAG | महानगरपालिकेत 2017 पासून झालेल्या भ्रष्टाचाराची CAG मार्फत चौकशी करण्याबाबत शिवसेनेचे आंदोलन
Pune Akashvani News | पुण्याबद्दल आकस नसेल तर प्रकाश जावडेकरांनी पुण्यासाठी एवढे तरी करावे – मोहन जोशी

Shivsena UBT Pune |  शहर विद्रूपीकरण करूनही भाजप वर कारवाई का नाही ? शिवसेना (UBT) गटाचा महापालिका आयुक्तांना सवाल

 

Shivsena UBT Pune – The Karbhari News Service – लोकसभेचे देशभर बिगूल वाजले. आचारसंहिता सुरु झाली. प्रशासनाने राजकीय नेत्यांचे बोर्ड झाकले. अनेक बॅनर काढले. पण आज पाच दिवस उलटूनही सत्ताधारी भाजप च्या विरोधात कणभर पण कारवाई झाली नाही.  हे प्रशासनाच भाजप साठीच राजकीय वरदान आहे की भीती हा प्रश्न शिवसेना पुणे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शहराच्या वतीने करण्यात आला. याबाबत महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांना निवेदन देखील देण्यात आले. (Pune Municipal Corporation (PMC)

शिवसेनेच्या निवेदना नुसार  स्वच्छ सर्वेक्षणात तसेच आत्ताच झालेल्या G20 परिषदेत पुणे महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरातील भिंती सुशोभीकरण केल्या होत्या. परंतू भारतीय जनता पक्षाच्या वतीने या आणि अनेक भिंतींवर राजकीय जाहिरातबाजी करुन स्वच्छ सर्वेक्षणात पुणेकरांची मान खाली घालविण्याचा प्रकार करुन शहर विद्रुपीकरण केले आहे.
तसेच देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली असूनही पुणे मनपा प्रशासन धृतराष्ट्राची भूमिका बजावत आहे. शहरात सर्रासपणे भाजप ने निवडणूक चिन्ह, मोदींच्या घोषणा, भाजप नेत्यांची नावे भिंतींवर लावली आहेत यातून शहर विद्रूपीकरणात अजुन हातभार लावला जात आहे.
मागील आठवड्यात शिवसेनेच्या वतीने आकाशचिन्ह व परवाना विभागाचे अधिकारी माधव जगताप यांना भेटून निवेदन देऊनही त्यावर आजतागायत कारवाई झालेली दिसत नाही .

या विरोधात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुणे शहराच्या वतीने पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.  पुणे मनपा प्रशासने यावर तत्पर कारवाई करावी अन्यथा शिवसेनेला लोकशाही च्या रक्षणार्थ पुणे मनपा विरोधात आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असे स्पष्ट सांगण्यात आले .

आयुक्तांनीही आचारसंहितेची कारवाई चालू केली आहे आणि चुकीचे काम करणाऱ्यांवर आम्ही गुन्हा दाखल करू असे आश्वासन यावेळी दिले .

यावेळी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे , शिवसेना माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, बाळासाहेब ओसवाल, अविनाश साळवे, विशाल धनवडे , पल्लवी जावळे, संगीता ठोसर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, उपशहर प्रमुख समीर तुपे , आनंद गोयल, प्रशांत राणे, उमेश वाघ, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, युवराज पारीख , गणेश काकडे, विभागप्रमुख अजय परदेशी, राजेश मोरे, राहुल जेकटे व शिवसैनिक उपस्थित होते .