PMC Circular DA Hike | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता लागू | मार्च पेड इन एप्रिल च्या वेतनात दोन महिन्याचा फरक दिला जाणार

HomeपुणेBreaking News

PMC Circular DA Hike | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता लागू | मार्च पेड इन एप्रिल च्या वेतनात दोन महिन्याचा फरक दिला जाणार

गणेश मुळे Mar 14, 2024 2:18 PM

DA Hike | 7th Pay Commission | घोषणा झाली नसली तरी महागाई भत्ता (DA) 46% होणार हे नक्की
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | जुलैमध्ये DA सोबत याचाही लाभ मिळणार
7th Pay Commission | DA Hike | केंद्रीय कर्मचार्‍यांना जुलैच्या सुरुवातीला मिळाली मोठी भेट | महागाई भत्ता (DA) वाढ निश्चित

PMC Employees DA Hike | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता लागू | मार्च पेड इन एप्रिल च्या वेतनात दोन महिन्याचा फरक दिला जाणार

PMC Employees DA Hike – (The Karbhari News Service) केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) ४ टक्के वाढ मंजूर केली आहे. जानेवारी 2024 पासून कर्मचाऱ्यांना ५० टक्के महागाई भत्ता मिळणार आहे.  याच धर्तीवर पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना (PMC Employees and Officers) सुधारित दराने महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे. यात एकूण दोन महिन्यांचा म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी चा फरक मार्च पेड इन एप्रिल च्या वेतनात दिला जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी जारी केले आहे.  (Pune Municipal Corporation (PMC)

पुणे मनपा अधिकारी/कर्मचारी यांना  केंद्र शासनाप्रमाणे महागाई भत्ता देण्याबाबत पुणे मनपा व कामगार संघटना यांचेमध्ये करार झालेला असून केंद्राप्रमाणे महागाई भत्ता देण्याचे धोरण व प्रचलित कार्यपध्दती आहे.

पुणे  महानगरपालिकेच्या अधिकारी/कर्मचारी यांना महागाई भत्त्याच्या दरामध्ये सुधारणा करून 1 जानेवारी पासून ४६ टक्के वरून ५० टक्के दराने माहे मार्च, २०२४ पेड इन एप्रिल २०२४ चे वेतनामध्ये फरकासहीत रक्कम जमा करावी. अशी मागणी महापालिका कामगार युनियन (Pune Mahanagarpalika Kamgar union) ने महापालिका आयुक्त यांच्याकडे केली होती.
याबाबत जारी केलेल्या परिपत्रकानुसार महापालिका कर्मचाऱ्यांना जानेवारी 2024 पासून 50% महागाई भत्ता दिला जाणार आहे. यात एकूण दोन महिन्यांचा फरक मार्च पेड इन एप्रिल च्या वेतनात दिला जाणार आहे. तसेच सेवानिवृत्त सेवकांना देखील 50% महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे. सेवानिवृत्त सेवकांना जानेवारी ते मार्च अशा 3 महिन्याचा फरक एप्रिल पेड इन मे च्या वेतनात अदा केला जाणार आहे. यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
PMC Circula DA Hike