PMC Futuristic School | महापालिका अभिनव शाळांसाठी 8 कोटी तर डीबीटी योजनेसाठी 31.50 कोटींची तरतूद!

HomeपुणेBreaking News

PMC Futuristic School | महापालिका अभिनव शाळांसाठी 8 कोटी तर डीबीटी योजनेसाठी 31.50 कोटींची तरतूद!

गणेश मुळे Mar 08, 2024 1:38 PM

PMC Budget 2024-25 | पुणे महापालिका आयुक्त 7 मार्च ला सादर करणार अंदाजपत्रक!  
Pune Municipal Corporation will become a support for the Divyang !
Pune Municipal Corporation Budget 2024-25 | पुणे महापालिकेच्या बजेट ने फक्त 10 हजार नाही तर 11 हजार कोटींचा टप्पा केला पार!

PMC Futuristic School | महापालिका अभिनव शाळांसाठी 8 कोटी तर डीबीटी योजनेसाठी 31.50 कोटींची तरतूद!

PMC Futuristic School – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाकडून (PMC Primary Education Department) अभिनव शाळा (PMC Futuristic School₹ तयार करण्यात येत आहेत. 2023-24 पासून याची सुरुवात झाली आहे. यावर्षी देखील 15 क्षेत्रिय कार्यालयात अभिनव शाळा तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar IAS) यांनी आगामी आर्थिक वर्षासाठी (PMC Budget 2024-25) 8 कोटींची तरतूद केली आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
फ्युचिरिस्टीक स्कूल – अभिनव शाळा – सन २३-२४ प्रमाणे सन २४-२५ मध्येही १५ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत फ्युचिरिस्टीक स्कूल तयार करण्यात येणार आहेत. अभिनव शाळा अंतर्गत ३० विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक Software व Hardware असलेले डेस्क Lan सिस्टीम सह तसेच प्रोग्रॅम लायसन्स फी व संपूर्ण
– Sylabus तसेच मुख्य पोडीयम Wall अशा अत्याधुनिक सुविधांचा यामध्ये अंतर्भाव केलेला आहे.
महापालिका आयुक्तांनी शिक्षणासाठी आधुनिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाला 751 कोटी तर माध्यमिक शिक्षण विभागासाठी 124.60 कोटीची तरतूद केली आहे.

| या असतील योजना

शिष्यवृत्ती परीक्षा – शिष्यवृत्ती परीक्षा व त्या अनुषंगाने केलेले शैक्षणिक नियोजन यासाठी र.रु. १ कोटी ५० लक्ष तरतूद करण्यात आलेली आहे.

– नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील ६५ प्राथमिक शाळा ताब्यात घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून सदर शाळांसाठी भौतिक सुविधा व १५,००० विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य पुरविणेकरिता पुरेशी तरतूद सुचविण्यात आलेली आहे.
– ई-लर्निंग प्रकल्प – पुणे मनपा संचलित १४६ शाळा इमारतीमधून सर्व माध्यमाच्या एकुण शाळांपैकी २६५ प्राथमिक शाळांमध्ये व नवीन शाळांसाठी ई-लर्निंग प्रकल्प कार्यरत आहे. सदर प्रकल्प पूर्ण झालेला असूनbदेखभाल दुरुस्तीसाठी व उर्वरित वर्गखोल्या ई-लर्निंग संच बसविणेकरिता तरतूद सुचविण्यात आलेली आहे.
डीबीटी योजना विद्यार्थ्यांकरिता पुढील आर्थिक वर्षातही विद्यार्थ्यांना विविध शालेय साहित्य पुरविणेकरिता एकुण र.रु. ३१.५० कोटीची डी.बी.टी. योजना प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
– क्रीडानिकेतन शाळा – पुणे महानगरपालिकेच्या ३ क्रीडानिकेतन शाळा असून या खेळाडू विद्यार्थ्यांसाठी
र.रु. ३.९२ कोटी तरतूद करण्यात आलेली आहे.
विद्यार्थी शैक्षणिक सहल – सन २३-२४ प्रमाणे सन २४-२५ मध्येही पुणे महानगरपालिकेच्या इयत्ता ५ वी ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येते, यासाठी तरतूद र.रु. १.८९ कोटी प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
विशेष मुलांची शाळा – विशेष मुलांच्या शाळेसाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी भरीव तरतूद करण्यात
आलेली आहे.