Pune Hawker’s License | पुण्यात विकली जाताहेत फेरीवाला प्रमाणपत्र! | पुणे महापालिकेकडून कारवाई करण्याचा इशारा 

HomeपुणेBreaking News

Pune Hawker’s License | पुण्यात विकली जाताहेत फेरीवाला प्रमाणपत्र! | पुणे महापालिकेकडून कारवाई करण्याचा इशारा 

गणेश मुळे Mar 05, 2024 3:52 PM

Encroachment Department of Pune Municipal Corporation (PMC) appeals to Hawker’s to release the seized goods within 7 days
Pune Municipal Corporation Latest News | खराडी परिसरात बांधकाम विकास विभागाकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई  | 15000 चौ.फूट क्षेत्र हटवले 
Hawkers Biometric Survey | पथारी विक्रेत्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याची मागणी

PMC Hawker’s License | पुण्यात विकली जाताहेत फेरीवाला प्रमाणपत्र! | पुणे महापालिकेकडून कारवाई करण्याचा इशारा

पुणे – (The Karbhari News Service) – Pune Hawker’s Certificate | पुणे शहरातील रस्ता पद-पथांवरील नोंदणीकृत काही पथ विक्रेते त्यांची प्रमाणपत्रे इतर पथ विक्रेत्यांना/नागरिकांना अनधिकृतपणे आर्थिक व्यवहार करून विकत असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपासणीत आढळून आले आहे. अशा व्यावसायिकांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा पुणे महापालिकेच्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडून देण्यात आला आहे. (PMC Encroachment/illegal construction Removal Department)
 केंद्र शासनाच्या “पथ विक्रेता अधिनियम, २०१४ मधील तरतुदीनुसार पुणे मनपाकडील नोंदणीकृत झालेल्या कोणत्याही पथ विक्रेत्यास देण्यात आलेले “फेरीवाला प्रमाणपत्र” हे इतर पथ विक्रेत्यांना अथवा नागरिकांना कोणत्याही मार्गाने विक्री करण्याचा अथवा अनधिकृतपणे व्यवसाय करणेस देण्याचा अधिकार दिलेला नाही. असे असताना एखाद्या नोंदणीकृत पथ विक्रेत्याने अशा प्रकारचा गैर मार्गाने आर्थिक देवान- घेवाण करून प्रमाणपत्र विकत देण्याचा इतर व्यक्तींशी गैर व्यवहार केल्यास त्यास पुणे महानगरपालिका जबाबदार राहणार नसून अशा गैर मार्गाने मिळविलेल्या फेरीवाला प्रमाणपत्रावर कोणालाही पदपथांवर व्यवसाय करता येणार नाही. तसेच असे प्रमाणपत्र विकत देणाऱ्या नोंदणीकृत पथ विक्रेत्याचे प्रमाणपत्र कायमस्वरूपी रद्द करण्यात येऊन व्यावसायिकाचे नाव मनपा प्रशासनाकडून काळ्या यादीत समाविष्ट केले जाईल. असा इशारा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.