NCP – Sharadchandra Pawar Pune |आयुष्मान भारत योजना रुग्णांच्या नव्हे तर विमा कंपन्यांच्या भल्यासाठी ! | राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने आंदोलन
Pune – (The Karbhari News Service) – मोदी सरकारच्या धोरणाच्या विरोधात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने केईएम् हॉस्पिटल चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. विविध घोषणा देत केंद्र सरकारच्या योजनेचा व केंद्र सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. “मोदी सरकारच्या घोषणा फसव्या योजना, मोदी सरकारचा गोलमाल गोरगरीब रुग्णांचे हाल, आयुष्मान भारतचा केवळ प्रचार गोरगरीब रुग्ण झाले बेजार, मोदी सरकार डोळे उघडा” अशा योजनांनी परिसर दणाणून गेला.
याबाबत प्रशांत जगताप आणि सांगितले कि, आयुष्मान भारत योजनेची जाहिरात आपल्या माथी मारण्यासाठी मोदी सरकार आपल्याच खिशातून कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. प्रत्यक्षात मात्र ही योजना गोरगरीब रुग्णांना नव्हे तर केवळ विमा कंपन्यांना फायदा देणारी आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार घेण्यासाठी गेलेल्या रुग्णांना अक्षरशः रुग्णालयांच्या दारात पडून राहावे लागत आहे. गोरगरीब रुग्णांचे हाल होत असताना योजनेत सुधारणा करायचे सोडून मोदी सरकार केवळ जाहिरातबाजीत मग्न आहे.
——
गेल्या एक महिन्यापासून आम्ही या योजनेच्या अंमलबजावणीचा मागोवा घेत आहोत. पुणे शहरातील सरकारी हॉस्पिटल्स वगळता एकाही हॉस्पिटल मध्ये आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार मिळत नाहीत. सरकारी हॉस्पिटल्स मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वांना उपचार मोफत मिळतात, म्हणून आयुष्मान भारत योजना ही केवळ धूळफेक असून देशाच्या नागरिकांच्या भावनांसोबत हा क्रूर खेळ आहे.
– प्रशांत जगताप, शहराध्यक्ष