BJP Leader Nilesh Rane PMC Property Tax | निलेश राणेंच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने वाजविला “बँड”

HomeBreaking Newsपुणे

BJP Leader Nilesh Rane PMC Property Tax | निलेश राणेंच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने वाजविला “बँड”

गणेश मुळे Feb 28, 2024 1:52 PM

Pune Property tax | उद्यापासून थकबाकी असलेल्या मिळकती जप्त करण्याची तीव्र मोहीम | उपायुक्त माधव जगताप यांचा पदभार स्वीकारल्यानंतर कामाचा धडाका सुरु! 
Pune Municipal Corporation Tax Due Details | 1 कोटींपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या फक्त 1746 बड्या लोकांनी महापालिकेचे 5182 कोटीं थकवले 
The process of distribution of 12 lakh property tax bills to Pune residents has started!

BJP Leader Nilesh Rane PMC Tax | निलेश राणेंच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने वाजविला “बँड”

| मिळकत करबुडवेगिरी विरोधात शिवसेना बँडबाजा राणेंच्या दारात.

 

पुणे – (The Karbhari Online ) –  पुण्यातील डेक्कन परिसरातील आर डेक्कन येथील इमारतीसमाेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाच्या वतीने आक्रमकपणे “बँड बाजा” वाजविला. पुणे महापालिकेने (PMC Pune) आर डेक्कन (R Deccan Mall Pune) परिसरात भाजप नेते निलेश राणेंची (BJP Leader Nilesh Rane) मिळकत कर न भरल्यामुळे सील केली. शिवसेनेच्या वतीने भाजप नेते निलेश राणेंच्या विरोधात “बँड बाजा” आंदोलन छेडले. यावेळी निलेश राणेंच्या फोटोला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

निलेश राणे यांना पुणे महापालिकेने दणका देत डेक्कन भागातील आर डेक्कन मॉलमध्ये मिळकत थकवल्या प्रकरणी पालिकेने राणेपुत्राला नोटीस बजावली होती. त्यानंतर महापालिकेच्या कर संकलन विभागाने थकित मिळकतीचा भाग सील केला. संबंधित मिळकतीची सुमारे साडेतीन कोटी रुपयांची थकबाकी होती. पुणे महापालिकेकडून नोटीस बजावूनही हा कर भरला जात नव्हता. त्यामुळे अखेर महापालिकेने तीन मजल्यांच्या मिळकतीचे वरचे दोन मजले सील केले आहेत. मात्र, एरवी एक मिळकत सील केली, तरी मोठा गाजावाजा करणाऱ्या प्रशासनाकडून मात्र ही माहिती गोपनीय ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. अशातच सामान्य पुणेकरांना वेगळा न्याय आणि भाजप नेत्यांना वेगळा न्याय असे का, सामान्य माणसाला सन्मान नाही का, पुणे प्रशासन भाजप किंवा राणे यांना घाबरते का? असा प्रश्न आंदोलनात विचारण्यात आला. यावेळी या आठवड्यात जर राणे यांनी मिळकत कर नाही भरला तर शिवसेना पुन्हा डेक्कन येथील हॉटेल समोर येऊन बँडबाजा घेऊन आंदोलनं करणार असे शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले .

यावेळी शिवसेना शहप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, प्रसिध्दी प्रमुख अनंत घरत, किशोर राजपूत, बाळासाहेब भांडे, अतुल दिघे, महेश पोकळे, उमेश वाघ, चंदन साळुंखे, मुकुंद चव्हाण, करुणा घाडगे, संतोष भुतकर, नागेश खडके, संदीप गायकवाड, राजेश मोरे, इम्रान खान, संजय वाल्हेकर, किरण शिंदे, राहुल शेडगे, आदिनाथ भाकरे, सचिन घोलप, विकी धोत्रे, प्रवीण डोंगरे, रणजित शिंदे, प्रतीक गालिंदे गणेश खलाटे, हरी सपकाळ, अनिल इनामदार, शशांक सोळंखी उपस्थित होते.