PMC PEHEL 2024 | ई-कचरा व प्लास्टिक संकलन करण्यासाठी 400 हून अधिक केंद्र | महापालिकेकडून पेहेल-२०२४ महाअभियानाचे आयोजन

HomeBreaking Newsपुणे

PMC PEHEL 2024 | ई-कचरा व प्लास्टिक संकलन करण्यासाठी 400 हून अधिक केंद्र | महापालिकेकडून पेहेल-२०२४ महाअभियानाचे आयोजन

गणेश मुळे Feb 22, 2024 2:03 PM

PEHEL 2024 Pune PMC | पेहेल-२०२४ |  4 तासात 53 टन ई-कचरा आणि प्लॅस्टिक जमा
PEHEL 2024 Pune PMC | 53 tonnes of e-waste and plastic Waste accumulated in 4 hours
More than 400 centers for e-waste and plastic collection in Pune  | Organization of Pehel-2024 campaign by Pune Municipal Corporation (PMC) 

PMC PEHEL 2024 | ई-कचरा व प्लास्टिक संकलन करण्यासाठी 400 हून अधिक केंद्र | महापालिकेकडून पेहेल-२०२४ महाअभियानाचे आयोजन

PMC PEHEL 2024 | संत गाडगे बाबा जयंतीनिमित्त (Sant Gadge Baba Jayanti) पुणे महानगरपालिकेतर्फे (Pune Municipal Corporation (PMC) दरवर्षी विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविणेत येतात. या मध्ये Deep Cleaning Drive, कचरा वर्गीकरण जनजागृती, कचऱ्याचे क्रॉनीक स्पॉट नष्ट करणे व पेहेल २०२४ (PMC PEHEL 2024) उपक्रम यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया फाऊंडेशन, केपीआयटी आणि पर्यावरण क्षेत्रातील स्थानिक सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे ‘पेहेल-२०२४’ या ई-कचरा व प्लास्टिक संकलन महाअभियानाचे शहर स्तरावर आयोजन केले आहे. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम (Sandip Kadam PMC) यांनी दिली.
 या अभियानामध्ये २५ फेब्रुवारी या रोजी संपूर्ण पुणे शहरामध्ये ४०० हून अधिक संकलन केंद्रे उभारली जाणार असून सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत
नागरिकांनी आपला सक्रीय सहभाग नोंदवावा. असे आवाहन महापालिका घनकचरा विभागाकडून (PMC Solid Waste Management Department) करण्यात आले आहे.
याअंतर्गत २४ फेब्रुवारीला शाळा-महाविद्यालयांमध्ये ई-कचरा व प्लास्टिक संकलन केले जाणार आहे. दिनांक १८ फेब्रुवारीपासून विविध स्तरावर जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जाणार असून २३ फेब्रुवारीला प्रवचने सादर होणार आहेत.
ई-कचरा आणि प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येवरील उपाय म्हणून या कचऱ्याचे स्वतंत्र संकलन, सुयोग्य व्यवस्थापन आणि शास्त्रीय पद्धतीने रिसायकलिंग करणे ही आजची गरज आहे. सर्व पुणेकरांना आवाहन आहे की, ‘पेहेल-२०२४’ महाअभियानामध्ये संकलनाच्या दिवशी मोठ्या संख्येने सहभागी होऊन घरामध्ये अथवा व्यवसायाच्या ठिकाणी निर्माण झालेला ई-कचरा व प्लास्टिक आपल्या जवळील संकलन केंद्रावर आणून जमा करावे. असे आवाहन पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.
 गोळा झालेल्या ई-कचऱ्यामधून दुरुस्त होऊ शकणाऱ्या वस्तूंची दुरुस्ती केली जाणार आहे. आणि या वस्तू गरजू विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांना डोनेट केल्या जातील. महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने नोंदणीकृत केलेल्या संस्थाना उरलेला ई-कचरा व प्लास्टिक कचरा सुपूर्त केला जाईल. पुढे या संस्थांद्वारे कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने रिसायकलिंग केले जाईल.
अधिक माहितीसाठी ९०७५००८९९४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आपल्या जवळील संकलन केंद्र पाहण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या.