Pune Property tax | उद्यापासून थकबाकी असलेल्या मिळकती जप्त करण्याची तीव्र मोहीम | उपायुक्त माधव जगताप यांचा पदभार स्वीकारल्यानंतर कामाचा धडाका सुरु! 

HomeBreaking Newsपुणे

Pune Property tax | उद्यापासून थकबाकी असलेल्या मिळकती जप्त करण्याची तीव्र मोहीम | उपायुक्त माधव जगताप यांचा पदभार स्वीकारल्यानंतर कामाचा धडाका सुरु! 

गणेश मुळे Feb 21, 2024 2:00 PM

PMC Property Tax Department | प्रॉपर्टी टैक्स विभागातील कर्मचाऱ्यांसाठी तणावमुक्त जीवन जगण्याची कार्यशाळा!
  5182 crores owed to the Pune municipal corporation by only 1746 big people with arrears of more than 1 crore
From today, the Pune Municipal Corporation starts using bands for Property tax arrears collection

Pune Property tax | उद्यापासून थकबाकी असलेल्या मिळकती जप्त करण्याची तीव्र मोहीम | उपायुक्त माधव जगताप यांचा पदभार स्वीकारल्यानंतर कामाचा धडाका सुरु!

Pune Property tax | महापालिकेच्या मिळकतकर विभागाची (PMC Property tax Department) जबाबदारी उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांच्याकडे देण्यात आली आहे.  जगताप यांनी नुकताच अतिरिक्त पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर जगताप यांनी लगेच कामाचा धडाका लावला आहे. मिळकत कर न भरणाऱ्या मिळकतधारकांवर मिळकत जप्त करणेची धडक मोहीम उद्यापासून सुरु केली जाणार आहे. माधव जगताप यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation Property tax Department)

पुणे महानगरपालिकेमधील कर आकारणी व कर संकलन विभाग हा उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता खात्यास देण्यात आलेल्या उद्दिष्ट पूर्ततेच्या अनुषंगाने कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडून थकबाकी वसुली, मिळकत जप्तीची व आकारणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. खात्याला 2400 कोटी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. (Pune Property tax bill)
त्यानुसार पुणे महानगरपलिका कार्यक्षेत्रातील ज्या मिळकतधारकांनी अद्यापही मिळकत कर भरलेला नाही, अशा थकबाकी असलेल्या मिळकती जप्त करण्याची तीव्र मोहीम 22 फेब्रुवारी पासून सुरु करण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात परिमंडळ निहाय पथके तयार करण्यात आलेली आहेत. नागरिकांना मिळकत कर भरणे सुलभ व्हावे याकरिता सर्व शासकीय सुट्टीच्या दिवशी व प्रत्येक शनिवार सकाळी १० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत व रविवार सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्रे सुरु ठेवण्यात आली आहेत.
नागरी सुविधा केंद्र सुरु राहणार असले तरी, नागरिकांनी जास्तीत जास्त online प्रणालीद्वारे
propertytax.punecorporation.org” या संकेतस्थळावरून मिळकत कर भरणे बाबत आवाहन करण्यात आले आहे.