Vikram Kumar PMC Commissioner | विकास कामाच्या वर्क ऑर्डर साठी अजून 10 दिवस मुदतवाढ

HomeपुणेBreaking News

Vikram Kumar PMC Commissioner | विकास कामाच्या वर्क ऑर्डर साठी अजून 10 दिवस मुदतवाढ

गणेश मुळे Feb 17, 2024 3:11 AM

Ganesh Visarjan Holiday | गणेश विसर्जनाच्या सुट्टीबाबत पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश जारी
 Important news for Pune Municipal Corporation employees |   Circular issued regarding the payment of the third installment of the 7th Pay Commission!
PMC HRA Circular | पुणे महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांना सुधारित दराने घरभाडे भत्ता देण्याबाबत परिपत्रक जारी! 

Vikram Kumar PMC Commissioner | विकास कामाच्या वर्क ऑर्डर साठी अजून 10 दिवस मुदतवाढ

| महापालिका आयुक्तांचा निर्णय

Vikram Kumar PMC Commissioner | महापालिका आयुक्तांनी आगामी लोकसभेची आचारसंहितेच्या (Loksabha Election Code of conduct) पार्श्‍वभूमीवर कामाच्या वर्क ऑर्डर २० ते २५ फेब्रुवारीपर्यंत देण्याचे आदेश सर्व विभागप्रमुखांना दिले होते. मात्र, ही मुदत 10 दिवसांनी वाढविण्यात आली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार ( Vikram Kumar IAS) यांनी याबाबतचे आदेश जारी (PMC Circular) केले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)

महापालिकेचे आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपते. दरवर्षी साधारण २५ मार्चपर्यंत कामाच्या अथवा खरेदीच्या वर्क ऑर्डर दिल्या जातात. जेणेकरून आर्थिक वर्ष संपण्यापुर्वी संबधीत ठेकेदारांना बिले महापालिकेकडे सादर करण्यास अवधी मिळतो. परंतू यंदा लोकसभा निवडणुकीचे वर्ष आहे. केव्हांही निवडणुका जाहीर होउन कामे आचारसंहितेत अडकण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी तीन आठवड्यांपुर्वी सर्व विभागांना २० ते २५ फेब्रुवारी पर्यंत सर्व कामांच्या वर्क ऑर्डर देण्याचे आदेश दिले होते.

आता आयुक्तांनी ही मुदत 10 दिवसांनी वाढवली आहे. या कालावधीत कामे पूर्ण न झाल्यास खात्याला जबाबदार धरले जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

Pmc circular