Maratha Reservation Survey in Pune City | Pune PMC News | पुण्यात पुणे महापालिकेकडून 14 लाख 30 हजार घरांचे सर्वेक्षण | शहरात 12 लाख मिळकती

HomeपुणेBreaking News

Maratha Reservation Survey in Pune City | Pune PMC News | पुण्यात पुणे महापालिकेकडून 14 लाख 30 हजार घरांचे सर्वेक्षण | शहरात 12 लाख मिळकती

गणेश मुळे Feb 03, 2024 8:11 AM

Loksabha Election 2024 Code of Conduct | महापालिका निवडणूक विभागाने सर्व विभागाकडून मागवली चालू विकास कामांची माहिती! 
Maratha Samaj Survey | PMC | पुणे महापालिकेच्या 1 हजार हून अधिक कर्मचाऱ्यांच्या मराठा आरक्षणाच्या कामासाठी नेमणुका 
PMC Election Department | आदर्श आचारसंहिता जारी झाल्यावर तात्काळ पक्षांच्या जाहिराती, बॅनर काढून टाकण्याचे आदेश 

Maratha Reservation Survey in Pune City | Pune PMC News | पुण्यात पुणे महापालिकेकडून 14 लाख 30 हजार घरांचे सर्वेक्षण | शहरात 12 लाख मिळकती

| उपायुक्त चेतना केरुरे यांची माहिती

Maratha Reservation Survey in Pune City| Pune PMC | पुण्यात पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC)) प्रगणकाद्वारे मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. 2 फेब्रुवारी म्हणजे विहित कालावधीत 14 लाख 30 हजार घरांचा सर्वे झाला आहे. महापालिका उपायुक्त चेतना केरुरे (Chetna Kerure PMC) यांनी ही माहिती दिली आहे. 23 जानेवारी पासून महाराष्ट्रात मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण (Maratha Reservation Survey in Maharashtra) सुरु करण्यात आले होते. (Maratha Reservation News)

| 3 हजारहून अधिक प्रगणकाची नियुक्ती

या कामासाठी  महाराष्ट्र  शासनाने महाराष्ट्र  राज्य मागासवर्ग  आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे  काम सोपवले होते. त्यानुसार पुणे शहरामध्ये  देखील मराठा समाज व खुल्या  प्रवर्गातील नागरिकाचे सर्वेक्षण  होत आहे.   सर्वेक्षण 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी  या कालावधीत पुणे मनपा (Pune Municipal Corporation) मार्फत नियुक्त केलेल्या 3 हजाराहून प्रगणकामार्फत पूर्ण करण्यात  आले आहे. सदरील  सर्वेक्षण  मनपा हद्दीतील घरोघरी जाऊन मोबाईल ॲप MSBCC वर livedata entry मार्फत  करण्यात आले. (Pune PMC News)

– मिळकतकर विभागाच्या माहितीनुसार शहरात 12 लाख मिळकती

2 फेब्रुवारी पर्यंत महापालिकेने 14 लाख 30 हजार घरांचे सर्वेक्षण केले आहे. शहरात जवळपास 12 लाख हून अधिक मिळकती आहेत. असे मिळकतकर विभागाचे म्हणणे आहे. याबाबत केरुरे यांनी सांगितले कि आम्ही हा अहवाल सरकारकडे जमा केला आहे. तसेच आम्हांला दिलेलं उद्दिष्ट आमच्या कर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने पूर्ण केले आहे.