Pune Sex Ratio | सावित्रीबाईंच्या पुण्यात 1 हजार मुलांमागे फक्त 890 मुली! 

HomeBreaking Newsपुणे

Pune Sex Ratio | सावित्रीबाईंच्या पुण्यात 1 हजार मुलांमागे फक्त 890 मुली! 

गणेश मुळे Jan 20, 2024 7:08 AM

Rahalkar Ram Mandir Pune | Pune Congress Mahaaarti |सदाशिव पेठेतील रहाळकर राममंदिरात पुणे काँग्रेस कार्यकर्ते करणार महाआरती
Pu La Deshpande Udyan Pune | पु. ल. देशपांडे उद्यानात आजपासून महिला बचत गट खाद्य महोत्सव
Pune Municipal Corporation Budget | 25 फेब्रुवारी पर्यंत कामे पूर्ण करा | तरतूद लॅप्स झाल्यास खात्याची जबाबदारी!

Pune Sex Ratio | सावित्रीबाईंच्या पुण्यात 1 हजार मुलांमागे फक्त 890 मुली! 

 
 

Pune Sex Ratio | स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी पुण्यातून सुरु केलं. मुली शिकल्या. सवरल्या. स्वतंत्र झाल्या. पुण्यामुळे देशात मुली सुरक्षित झाल्या. मात्र तेच पुणे शहर (Pune City) मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात मागेच असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पुढारलेल्या पुण्यात ही स्थिती व्हावी, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिका आरोग्य विभागाच्या (PMC Health Department) माहितीनुसार पुणे शहरात मुलींचे जन्माचे प्रमाण 2023 साली घटून 890 वर आले आहे. 2020 साली हे प्रमाण 946 होते. मागील काही वर्षात महापालिकेने चांगले काम करत हे प्रमाण 879 वरून 946 पर्यंत आणले होते. मात्र आता पुणे शहरातील मुलींच्या जन्माच्या प्रमाणात चांगलीच घसरण होत चालली आहे. सावित्रीबाईंचे स्मारक जिथे होणार आहे अशा पुण्यात ही स्थिती का यावी?  पुणे शहर फिरून १० वर्ष का मागे जावे? याबाबत पुणे महापालिका आरोग्य विभाग आणि राज्य सरकार काही आत्मपरीक्षण करणार आहे का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.  (Pune Sex Ratio)

 

: अधिकारी बदलामुळे होतोय परिणाम 

 
एक हजार मुलांच्या जन्मामागेच मुलींच्या जन्माचे प्रमाण काढण्यात येते. पुणे महापालिकेकडून (PMC Pune) अथवा कोणत्याही शहर, जिल्ह्यातून मुलींच्या जन्माची आकडेवारी उपलब्ध झाल्यास त्यावरून लिंग गुणोत्तर निश्चित केले जाते. जन्म विभागाकडे दैनंदिन मुला मुलींच्या जन्माची नोंदणी केली जाते. त्यातून संकलित माहितीच्या आधारे हे प्रमाण काढले जाते. लिंग गुणोत्तराच्या बाबतीत पुणे शहर आणि महापालिका राज्यात वरच्या स्थानावर होती. याबाबत महापालिकेचे राज्य सरकार कडून कौतुक देखील केले जायचे. महापालिकेकडून वेगवेगळ्या उपाय योजना राबवून आणि जनजागृती करून हे प्रमाण वाढवले गेले होते. मात्र 2021पासून हे प्रमाण चांगलेच घसरले आहे. मुलींचे स्वागत करण्यात पुढारलेले पुणे उणे का असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. दरम्यान महापालिका जनजागृती करण्यात आणि लिंग तपासणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्यात कमी पडली असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण आरोग्य खात्याकडून अधिकाऱ्याच्या बदल्या केल्या गेल्या. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्या कडून याबाबतचे काम काढून घेण्यात आले. नवीन आलेल्या अधिकाऱ्यांना कामाचे स्वरूप समजून घेण्यातच वेळ गेला. त्यामुळे कारवाई होऊ शकली नाही.  (Pune Municipal Corporation Health Department)
 

: 2020 ला सेक्स रेशो 946 

दरम्यान, ‘ 2010 साली पुणे शहरातील मुलींच्या जन्माचे प्रमाण 879 होते. 2011 मध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण 884 एवढे होते. 2012 व 2013 मध्ये अनुक्रमे 934 व 933 एवढे प्रमाण होते. 2014 मध्ये त्यात थोडीशी वाढ होऊन ते 937 पर्यंत गेले, तर 2015 मध्ये  हे प्रमाण घसरून 925 पर्यंत खाली आले होते. त्यानंतर 2019 ला 922 तर 2020 ला हे प्रमाण 946 पर्यंत आले होते. मात्र 2021 मध्ये यात खूपच घसरण झाली. 1000 मुलांच्या मागे मुलींचे प्रमाण फक्त 900 असे होते. तर 2022 साली यात थोडीशी सुधारणा होऊन हे प्रमाण 910 इतके झाले. त्यानंतर आता 2023 सालात देखील संख्या कमीच असल्याचे दिसून येत आहे.  910 वरून हे प्रमाण 890 इतके असल्याचे दिसून आले आहे. म्हणजे फिरून आपण २०१० सालासारखे मागे गेलो आहोत.

: लिंग गुणोत्तर (sex Ratio) प्रमाण 

 
वर्ष             रेशो 
 
2010     879
2011     884
2012     934
2013     933
2014      937
2019       922
2020.      946
2021.       900
2022.       910
2023.       890