PMC Fireman Bharti  Results | फायरमन पदाचा अंतिम निकाल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात! 

HomeपुणेBreaking News

PMC Fireman Bharti  Results | फायरमन पदाचा अंतिम निकाल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात! 

गणेश मुळे Jan 19, 2024 6:40 AM

PMC Wheelbarrow | संकलित केलेल्या कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी 2 बकेट असलेल्या 1425 व्हीलबॅरो खरेदी करणार महापालिका 
MLA Ravindra Dhangekar Vs Dheeraj Ghate | आमदार रवींद्र धंगेकर हवेने भरलेला फुगा | धीरज घाटे यांची टीका 
Shivajinagar Bus Station Pune | अडीच वर्षात शिवाजीनगर येथील बसस्थानाकाचे काम पूर्ण होणार!

PMC Fireman Bharti  Results | फायरमन पदाचा अंतिम निकाल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात!

| अग्निशमन साहित्याची ओळख याबाबत पुनर्तपासणी केलेल्या सुधारित गुणांची यादी प्रसिद्ध

Pune Mahanagarpalika Fireman Bharti 2023 | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने फायरमन (Fireman) पदासाठी पात्र झालेल्या 575 उमेदवारांची शारीरिक चाचणी परीक्षा 26 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत  घेण्यात आली. दरम्यान अग्निशमन साहित्य ओळख बाबत घेतलेल्या लेखी परीक्षेची उमेदवाराची उत्तरपत्रिका आणि योग्य विवरणी महापालिका वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांच्या काही हरकती असल्या तर त्या देण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार काही हरकती आल्या होत्या. याचे निरसन करून प्रशासनाकडून सुधारित गुणांची यादी मनपा संकेतस्थळावर प्रसिद्ध  केली आहे. दरम्यान आता निवड समितीच्या बैठकीत या सगळ्या प्रक्रिये बाबत चर्चा करून अंतिम निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे.  फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निकाल प्रसिद्ध केला जाऊ शकतो.  अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिली. (Pune Mahanagarpalika Fireman Bharti 2023)
पुणे महापालिकेच्या वतीने 320 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली. यातील 200 जागा या फायरमन पदाच्या होत्या. त्यानुसार महापालिकेकडे 3500 हून अधिक अर्ज आले होते. या उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. 120 मार्कांची परीक्षा होती. यात किमान 54 गुण मिळणे आवश्यक होते. यात 666 लोक उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार शारीरिक चाचणी परीक्षेसाठी 575 उमेदवार पात्र ठरले होते. त्यानुसार शारीरिक चाचणी परीक्षा  ही 26 ते 29 ऑक्टोबरला आणि 22 नोव्हेंबर ला घेण्यात आली होती.  त्यानुसार या चाचणीचे गुण महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर अग्निशमन साहित्य ओळख बाबत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी 5 गुण होते. परीक्षेची उमेदवाराची उत्तरपत्रिका आणि योग्य विवरणी महापालिका वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली होती. याबाबत काही हरकती असतील तर त्या देण्यास सांगण्यात आले होते. (Pune Mahanagarpalika Bharti)
त्यानुसार काही उमेदवारांनी हरकती घेतल्या आहेत. यामध्ये गुण कमी मिळणे, उत्तर बरोबर असून कमी गुण मिळणे, प्रतिस्पर्धी उमेदवाराला जास्त गुण देणे, अशा हरकतींचा समावेश होता. यामुळे प्रशासनाने सर्वच उत्तरपत्रिका पुन्हा एकदा तपासण्याचे आदेश दिले होते. ‘अग्निशमन साहित्याची ओळख’ यामधील उत्तरांबाबत आणि गुणांबाबत उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या हरकती विचारात घेऊन उमेदवारांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करण्यात आलेली आहे. पुनर्तपासणीमध्ये बदल झालेल्या उमेदवारांच्या सुधारित गुणांचा तक्ता व संबंधित उत्तरपत्रिका मनपा संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत आली आहे. तसेच यापुढे याबाबत कोणतीही हरकत विचारात घेतली जाणार नाही, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

: निवड समितीच्या बैठकीनंतर प्रसिद्ध होणार अंतिम यादी

दरम्यान अंतिम निकालासाठी उमेदवारांना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्याची वाट पाहावी लागणार आहे. कारण आता या सगळ्या भरती प्रक्रिये बाबत निवड समितीची बैठक लावली जाणार आहे. या समितीत 8 ते 10 सदस्य असतात. आरक्षण आणि गुण प्रक्रियेवर समितीत चर्चा केली जाईल. त्यानंतर समितीच्या मान्यतेने अंतिम निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. समितीची बैठक आगामी आठवड्यात होईल, अशी शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली.