Khadki Aundh Road | PMC Road Department | एका रात्रीत बनवला खडकी – औंध रस्ता | अतिरिक्त आयुक्त आणि महापालिकेच्या पथ विभागाने करून दाखवले

HomeपुणेBreaking News

Khadki Aundh Road | PMC Road Department | एका रात्रीत बनवला खडकी – औंध रस्ता | अतिरिक्त आयुक्त आणि महापालिकेच्या पथ विभागाने करून दाखवले

गणेश मुळे Jan 13, 2024 3:39 AM

PMC Encroachment Action | नगर रोड, वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय हद्द आणि गोयल गंगा रस्त्यावरील अतिक्रमणावर महापालिकेकडून जोरदार कारवाई
PMC Encroachment Action | औंध मधील साई चौकात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे मनपाची संयुक्त कारवाई | आज रात्रीच रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार 
PMC Encroachment Action | कल्याणीनगर वडगावशेरी येथील अनाधिकृत रूफ टॉप हॉटेल वर पुणे महापालिकेची कारवाई

Khadki Aundh Road | PMC Road Department | एका रात्रीत बनवला खडकी – औंध रस्ता | अतिरिक्त आयुक्त आणि महापालिकेच्या पथ विभागाने करून दाखवले

Khadki Aundh Road | PMC Road Department |  पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाने एखादी गोष्ट मनावर घेतली तर अशक्य ते शक्य कसे होऊ शकते, याचे उदाहरण काल रात्री पाहायला मिळाले. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakane PMC) आणि पथ विभागाचे अधिकारी अनिरुद्ध पावसकर (Anirudh Pawaskar PMC), साहेबराव दांडगे (Sahebrao Dandge PMC) आणि दिनकर गोजारे (Dinkar Gojare PMC) यांनी प्रयत्नांची शिकस्त करत अवघ्या रात्रभरात खडकी औंध (Khadki Aundh Road) असा चारपदरी रस्ता तयार केला आहे. त्यासाठी हे अधिकारी रात्रभर जागेवर तळ ठोकून होते. अतिरिक्त आयुक्तांनी या अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे.

औंध परिसरातील (Sai Chowk, Aundh Pune) साई चौक, जयकर पथ येथे काल अतिक्रमण कारवाई करण्यात आली. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड (Khadki Cantonment Board) व पुणे मनपाच्या (Pune Municipal Corporation) वतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली. यामध्ये जवळपास ४४ अनधिकृत स्टॉल हटवण्यात आले. दरम्यान रस्ता मोकळा झाल्याने काल रात्रीच रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असून हा रस्ता चौपदरी केला जाणार, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिले होते.

PMC Road Department Officers

खडकी औंध रस्त्याचे तीन शिल्पकार

त्यानुसार रात्रभर पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर,  अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे आणि दिनकर गोजारे हे  अधिकारी खडकी साई चौक ते स्पायसर, औंध रस्ता करायला तळ ठोकून होते. एका रात्रीतून राडारोडा काढणे,फीडर बॅाक्स आणि लाईटपोल काढणे,झाडे ट्रांन्सप्लांट करणे आणि रोड बनवणे खूप अशक्य गोष्ट!  मात्र PMC ने करून दाखवले. याबद्दल अतिरिक्त आयुक्तांनी पथ विभागाच्या कामाबाबत अभिमान असल्याची भावना व्यक्त केली आहे.

दरम्यान कालच महापालिकेने या भागातील अतिक्रमण काढून टाकले होते. हा भाग खडकी कॅन्टोन्मेंट व पुणे म.न.पा हद्दीवर येत असून, कॅन्टोन्मेंट हद्दीत येतो. खडकी रेल्वे स्टेशन पिछाडीस हा चौक येतो. औंध, बोपोडी हद्दीतील नागरिक याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. या चौकामध्ये सुमारे 44 स्टॉल धारकांनी अनेक वर्षापासून अतिक्रमण केले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रारी आल्या होत्या. त्याबाबत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे म.न.पा ला संयुक्त कारवाई करनेच्या सूचना दिल्या होत्या. खडकी कॅन्टोन्मेंट मुख्याधिकारी यांनी पुणे म.न.पा कडे अतिक्रमण कारवाई व रस्ता दुरूस्ती साठी मदत मागितली. महापालिका आयुक्त यांनी आवश्यक सहकार्य करणेचे मान्य केले. त्यानुसार काल संयुक्त कारवाई करणेत आली. त्यामध्ये सर्व 44 स्टॉल काढून टाकण्यात आले.  त्यामुळे साई चौक मोकळा झाला. रात्री त्याचे डांबरीकरण करून, ज्यादा उपलब्ध रस्त्याचे तातडीने रूंदीकरण करणेत आले.  सध्या उपलब्ध 12 मी रुंदीचा रस्ता सुमारे 24मी पर्यंत रुंदीचा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटनेस मदत होणार आहे.

—/