Politics : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदास नकार दिला होता; मीच त्यांना आग्रह केला : शरद पवार 

HomeBreaking NewsPolitical

Politics : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदास नकार दिला होता; मीच त्यांना आग्रह केला : शरद पवार 

Ganesh Kumar Mule Oct 16, 2021 11:54 AM

Property Tax | PMC | 40% कर सवलत | महापालिकेचा तात्पुरता दिलासा | गरज मात्र कायमस्वरूपी निर्णयाची 
PMC Contract Employees | ESIC | कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी हेळसांड नको, अशी मागणी करत कामगार युनियनची निदर्शने!
Underground Pune Metro | भुयारी मार्गातून पुणे मेट्रो धावली | पुणे मेट्रोच्या भूमिगत मार्गामध्ये ट्रेनची चाचणी

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदास नकार दिला होता; मीच त्यांना आग्रह केला : शरद पवार

शरद पवार यांनी दिली माहिती

पुणे : आज पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी नेते शरद पवार (sharad pawar) यांनी केंद्रावर सडकून टीका केली आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता त्यावेळेस मीच उद्धव ठाकरेंचा  हात धरत हेच मुख्यमंत्री होतील असं आमदारांच्या बैठकीत सांगितले होते, ही माहितीही पवार यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

सुरुवातीला उद्धव ठाकरे तयार नव्हते

सुरवातीला उद्धव ठाकरे  नेतृत्व करण्यास तयार नव्हते. मुख्यमंत्री पदास त्यांनी नकार दिला होता. पण आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला संधी द्यावी म्हणून मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला, असं पवार  पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. त्यावेळी राज्यात आघाडी सरकार बनवण्यात माझाही सहभाग होता, ही माहिती पवार यांनी दिली. राज्यात सरकार तयार होताना मुख्यमंत्री शिवसेनाचा होईल हे सर्वांनी एकमताने मान्य केल्याचे शरद पवारांनी यावेळी सांगितले.

जिथं भाजपची सत्ता नाही तिथल्या सरकारला केंद्र सरकार केंद्रीय संस्था हातात धरून त्रास देत आहे.केंद्र सरकारला सामान्य माणसांविषयी आस्था नाही. पेट्रोल- डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत म्हणत राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारकडून 35 हजार कोटी जीएसटी रक्कम येणे बाकी आहे. तर 3 हजार कोटींची बाकी असल्याने कोळशाचा पुरवठा मात्र थांबवल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला. सध्या सीबीआय, आयकर, एनसीबी आणि ईडीसारख्या केंद्रीय संस्थांचा वापर करून भाजपविरहीत राज्य सरकारांना भाजप त्रास देत असल्याचे पवार म्हणाले.