Hadapsar Traffic Congestion | लवकरच होणार हडपसर परिसराचा कायापालट.! | शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचा पुढाकार 

HomeBreaking Newsपुणे

Hadapsar Traffic Congestion | लवकरच होणार हडपसर परिसराचा कायापालट.! | शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचा पुढाकार 

कारभारी वृत्तसेवा Dec 26, 2023 3:59 PM

Pramod Nana Bhangire | भारतातील प्रभू श्रीरामांच्या पहिल्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्र्याचा हस्ते होणार उद्घाटन
PM Awas Yojana | PMC Pune | पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेकडून वडगाव, हडपसर आणि खराडी येथे उभारल्या 2650 सदनिका  | पंतप्रधान यांच्या हस्ते देण्यात येणार घराच्या चाव्या 
Changes in transport | श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळयासाठी वाहतुकीत बदल

Hadapsar Traffic Congestion | लवकरच होणार हडपसर परिसराचा कायापालट.! | शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचा पुढाकार

 

Hadapsar Traffic Congestion | हडपसर, मुंढवा, केशवनगर व मांजरी या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. येथील नागरिकांना दैनंदिन जीवनात प्रवास करत असताना, वाहतूक कोंडी सारख्या समस्येला दररोज सामोरे जावे लागत आहे. मात्र आता हडपसर परिसराचा कायापालट लवकरच होणार आहे. हडपसरला वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जाणार आहेत. शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे.  (Hadapsar Pune)

हडपसर च्या समस्याबाबत प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही प्रशासन कोणताही ठोस असा निर्णय घेत नसल्यामुळे, काही दिवसांपूर्वी मुंढव्यातील महात्मा फुले चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी आंदोलन मागे घेण्यासाठी, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी मध्यस्थी करत हडपसरला वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी लवकरच सविस्तर बैठक घेऊ असा शब्द दिला होता.

याच पार्श्वभूमीवर आज पुणे महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांना हडपसर, मुंढवा, केशवनगर व मांजरी भागात वारंवार होत असलेल्या वाहतूक कोंडी बाबत निवेदन दिले. तसेच, निवेदनाच्या माध्यमातून घोरपडी व कोरेगाव पार्क मार्गे मुंढव्यापर्यंत भुयारी मार्ग करण्यात यावा. केशवनगर, मांजरी रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता अरुंद करावा. रस्त्यात येत असलेल्या झाडांच्या फांद्या व महावितरण चे पोल व डी. पी बॉक्स यांचे व्यवस्थापन करावे. अशा प्रकारची मागणी केली. व इतर विविध विषयांवर चर्चा केली.

यावेळी बैठकीला पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे , पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, प्रसाद काटकर व ढवळे  तसेच, इतर विविध विभागातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

| हे होते प्रमुख मुद्दे

१) महात्मा फुले चौक मुंडवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून ती कायमस्वरूपी सोडवण्यासाठी घोरपडी व कोरेगाव पार्क मार्गे मुंडव्यातून केशवनगर ला जाताना भुयारी मार्ग करण्यात यावा.
२) तसेच महात्मा फुले चौकातून केशवनगर ला जाताना मध्ये वस्तीपर्यंत मुख्य डीपी रस्ता झाला आहे. परंतु बधे वस्ती पासून ते केशवनगर वड्याच्या पुलापर्यंत डाव्या बाजूने रस्ता रुंदीकरण झालेले नाही सदर रस्त्यात येत असलेले झाडे स्थलांतर करून माननीय विकास आराखड्यानुसार पूर्ण रस्ता वड्याच्या पुलापर्यंत करण्यात यावा.
३) छत्रपती शिवाजी महाराज चौक केशवनगर मांजरी रोड जात असताना मोठ्या प्रमाणात अरुंद रस्ता सुरुवातीला आहे सदरच्या परिसरातील अतिक्रमणे मोबदला देऊन त्वरित स्थलांतर करावेत त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण माननीय विकास आराखड्यानुसार त्वरित करण्यात यावे.
४) केशवनगर मांजरी रोड के आर बी वर्कशॉप आनंद नगर पासून ते लोणकर नगर चौक मार्गे झेड कॉर्नर पर्यंत सध्याच्या परिस्थितीला ४० फुटी रस्ता मोकळा आहे परंतु वीस फुटावरनच डांबरीकरण असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे रोडच्या दोन्ही बाजूने दहा दहा फुटाचे साईट पट्ट्याचे काम त्वरित सुरू करून वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वरील काम
त्वरित मार्गी लावावे. केशवनगर मांजरी रोड लोणकर नगर चौकात मोठ्या प्रमाणात सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे लोणकर नगर चौकातून साडे सतरा नळीला उजव्या बाजूला वळताना अतिशय अरुंद रस्ते असल्यामुळे वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे लोणकर नगर चौकात त्वरित रस्ता रुंदीकरण करून वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सिग्नल बसवण्यात यावेत व होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना मुक्त करावे.
५) केशवनगर छत्रपती शिवाजी महाराज चौक मांजरी रोड सदर वाहतूक कोंडीला अडथळा ठरणारे व नियोजित विकास आराखड्यानुसार रस्त्याच्या मध्ये अडथळा ठरणारे झाडे महावितरण चे पोल महावितरण चे बॉक्स प्रत्यक्ष पाहणी करून त्वरित स्थलांतर करावेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल.
६) केशवनगर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रेणुका माता मंदिर रोड ह्या रोडचे रुंदीकरण करणे अतिशय आवश्यक आहे विकास आराखड्यानुसार अतिक्रमणात असणारे पाणी करून स्थलांतर करावेत त्यांनाही मोबदला देण्यात यावा.