World Divyang Day |PMC Pune दिव्यांगाच्या जुन्या योजनात बदल करून नवीन योजना आणणार | अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांचे आश्वासन
World Divyang Day |PMC Pune | पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Municipal Corporation) दिव्यांगा साठी या वर्षात काही नविन योजना सुरू करण्यात येणार असून, काही जुन्या योजनांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. योजनांचा जास्तीत जास्त दिव्यांग नागरिकांना लाभ व्हावा यासाठी प्रसिद्धी व प्रचार करणेत येणार असून दिव्यांगांना सोशल मिडीयाचा वापर करता यावा, यासाठी केंद्र, राज्य व स्थानिक संस्थेमार्फत माहिती देणेत येईल व मदत केली जाईल. असे आश्वासन महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार (IAS Dr Kunal Khemnar) यांनी दिले. (World Divyang Day |PMC Pune)
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पुणे महानगरपालिका, समाज विकास विभागाच्या वतीने पुणे शहरातील दिव्यांग नागरिकांसाठी आज बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर, पुणे -५ येथे सकाळी ११.०० ते दु. ३.०० या वेळेत कार्यक्रम आयोजित करणेत आला होता. सदर कार्यक्रमाची सुरूवात मा. श्री. प्रविण पुरी, दिव्यांग आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र शासन, मा. डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ.), पुणे महानगरपालिका तसेच दिव्यांग संघटना प्रतिनिधी यांचे शुभहस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत श्री. नितीन उदास, उप आयुक्त, समाज विकास विभाग यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी पुणे महानगरपालिका हद्दीतील विविध दिव्यांग प्रवर्गातील व एका सामाजिक संस्था प्रतिनिधी यांच्यातून निवड झालेले दिव्यांग समन्वय समिती सदस्य श्री. रफीक खान, श्री. बाबासाहेब राऊत, श्री.पन्नालाल निकम, श्री. सुजित गोयर, श्री. राजेंद्र जोग यांचा सत्कार करणेत आला. तसेच दिव्यांग घटकांतर्गत शैक्षणिक, क्रिडा, सामाजिक, कला, सांस्कृतिक इ. क्षेत्रात विशेष कार्य केलेल्या संतोष गाढे, सुदिप्ता जैन, पूनम उमाप, नरेंद्र गुप्ता, राघव बारवकर, रेखा पडवळ, डॉ. स्वाती सदाकळे, अशोक मोरे, प्रकाश चव्हाण, मारिप्पा अचकेरी, सविता बियानी, प्रियांका दबडे, प्रमोद वैशंपायन, सचिन ओव्हाळ, प्रदीप ताम्हाणे, दिलीप लोखंडे, दिलीप सोनवणे, बिलकास पठाण, हरी तुपसमुद्रे, रामचंद्र कंक, धर्मेंद्र सातव, बाबूराव पुजारी, ज्ञानेश्वर शिंदे, पन्नालाल निकम, रमेश नंदनवार, सतिश सावंत, सचिन पडवळ, अजय पालांडे, बंडु तळीखेडकर, तृप्ती चोरडिया, हरिदास शिंदे, महिला व्हिल चेअर बास्केटबॉल संघ, आकाश कुंभार, कॅप्टन लुईस जॉर्ज मेप्रथ, सुवर्णा लिमये, मेघना मुनोत, पुरूष व्हिल चेअर रग्बी संघ, प्रवीण सोलनकर, पंकज साठे अशा एकुण -३९ दिव्यांगांचा गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव
करणेत आला. तसेच पुणे महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग कल्याणकारी योजनेच्या ५ लाभार्थ्यांना धनादेश वाटप करणेत आले.
दिव्यांगांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच विविध उपचार पद्धती व कृत्रिम अवयव, योजना यांची माहिती व्हावी, यासाठी कार्यक्रम स्थळी ग्रो बेटर स्किल्स-रेड्डीज फाऊंडेशन, समर्थनम ट्रस्ट फॉर डिसेबल्ड,
नव भारत विकास फाऊंडेशन, रिगेन पेडीअॅट्रिक थेरपी सर्विसेस या संस्थांचे व समाज विकास विभागाचे स्टॉल लावणेत आले व माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या वेळी यापुर्वी योजनेचा लाभ घेतलेल्या यशस्वी दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच दिव्यांग संघटना प्रतिनिधींनी आपल्या मनोगतात दिव्यांग कल्याणकारी योजना अधिक प्रभावीपणे कशा
राबवाव्यात तसेच कालानुरूप व गरजेनुसार काय बदल करण्यात यावे, दिव्यांगांनी शिक्षण घ्यावे यासाठी चांगल्या प्रकारच्या शैक्षणिक योजना तसेच आरोग्यासाठी वैद्यकिय योजना असाव्यात, याबाबत आपल्या स्पष्ट सुचना मांडल्या.
आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल. तसेच आजच्या मेळाव्यासाठी दिव्यांग नागरिकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असून अन्य राज्यांमध्ये जसे विविध दिन साजरे केले जातात तसेच दिन पुणे महानगरपालिकेनेही साजरे करावेत, असे सांगितले व दिव्यांगांना कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय दृष्टीहिन संघ या संस्थेचा विविध गुणदर्शन (ऑर्केस्ट्रा) कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. राजेंद्र मोरे, सहाय्यक समाज विकास अधिकारी, तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. असंग पाटील, उप समाज विकास अधिकारी, समाज विकास विभाग यांनी केले.
श्री. रामदास धावडे, समाज सेवक, संदीप कांबळे, सुजाता टिळेकर, श्रीमती सुवर्णा खेंगरे व समाज विकास विभागाकडील अधिकारी / कर्मचारी तसेच दिव्यांग सामाजिक संस्था, दिव्यांग संघटना स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी,
सभासद व इतर मान्यवर उपस्थित होते.