MP Dhiraj Prasad Sahu | धीरज साहू च्या संपत्तीत कोण भागीदार याचा शोध यंत्रणांनी घ्यावा | हर्षदा फरांदे

HomeपुणेBreaking News

MP Dhiraj Prasad Sahu | धीरज साहू च्या संपत्तीत कोण भागीदार याचा शोध यंत्रणांनी घ्यावा | हर्षदा फरांदे

कारभारी वृत्तसेवा Dec 11, 2023 1:44 PM

BJP Pune | Bhide Wada Smarak | ऐतिहासिक भिडे वाड्याचे रुपांतर लवकरच राष्ट्रीय स्मारकात होणार, भाजपाकडून साखर वाटून आनंदोत्सव
Dipa Mudhol Munde IAS | बाल विवाह निर्मुलनाकरीता दिपा मुधोळ-मुंडे यांना स्कॉच संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
Pune Water cut | नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

MP Dhiraj Prasad Sahu | धीरज साहू च्या संपत्तीत कोण भागीदार याचा शोध यंत्रणांनी घ्यावा | हर्षदा फरांदे

MP Dhiraj Prasad Sahu | काँग्रेस (Congress) च्या एका राज्यसभेच्या खासदाराकडे ३०० कोटींची बेहिशोबी मालमत्ता सापडते ह्या ३००कोटीच्या संपत्तीत नक्की कोण कोण भागीदार आहे. हे यंत्रणा नक्कीच शोधतील महागाईच्या विषयावर आंदोलन करणारे काँग्रेस जनतेच्या पैशावर डल्ला मारून आपण कसे स्वच्छ असल्याचा आव आणत आहे. परंतु खासदार धीरज साहू यांच्याकडे सापडलेल्या बेहिशोबी संपत्ती वर चकार शब्द काढत नाही. यावरून त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराला काँग्रेस चा पाठिंबा आहे असेच दिसून येते. असा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीच्या पुणे महिला आघाडीच्या (BJP Pune Mahila Morcha) अध्यक्षा हर्षदा फरांदे (Harshada Pharande) यांनी केला.

पुणे शहर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने शहराच्या आठही मतदारसंघात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी सरचिटणीस प्रियांका शेंडगे, उज्वला गौड, गायत्री खडके ,स्वाती मोहोळ, श्यामा जाधव , आरती कोंढरे ,कोमल कुटे ,कांचन कुंबरे, अस्मिता करंदीकर,प्रियांका श्रीगिरी, अपर्णा कुऱ्हाडे, मनीषा मोरे व सर्व महिला उपस्थित होत्या.